Join us  

T20 Cricket : सहा षटकार, सहा चौकार, १२ चेंडूत ६० धावा, टी-२० या फलंदाजाने केली तुफानी खेळी   

T20 Cricket : हा सामना नेपाळ टी-२० लीगमध्ये खेळवला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानचा अनुभवी खेळाडू असलेल्या समिउल्लाह शेनवारी याने चौकार षटकारांची आतिषबाजी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 4:30 PM

Open in App

टी-२० क्रिकेट हा षटकार चौकारांच्या आतषबाजीमुळे कमालीचा लोकप्रिय ठरत चालला आहे. या खेळात फलंदाज विस्फोटक खेळी करण्याच्या इराद्यानेच खेळपट्टीवर उतरत असतात. अशाच एका खेळाडूने विस्फोटक खेळी करत मैदानात षटकार चौकारांचा पाऊस पाडला आहे. हा सामना नेपाळ टी-२० लीगमध्ये खेळवला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानचा अनुभवी खेळाडू असलेल्या समिउल्लाह शेनवारी याने चौकार षटकारांची आतिषबाजी केली.

समिउल्लाह शेनवारीने ४० चेंडूत १९५ च्या स्ट्राईक रेटने ७८ धावा कुटल्या. त्यात त्याने प्रत्येकी ६ षटकार आणि ६ चौकार ठोकले. शेनवारीने नेपाळ टी-२० लीगमध्ये जनकपूर रॉयल्सकडून खेळताना बीरतनगर सुपरकिंग्सविरोधात ही खेळी केली. शेनवारी ७८ धावा काढून नाबाद राहिला. त्याच्या या खेळीच्या जोरावर जनकपूर संघाने २० षटकांमध्ये ५ बाद १८९ धावा कुटल्या.

३५ वर्षीय समिउल्लाह शेनवारी हा अनुभवी फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ८४ वनडे आणि ६५ टी-२० सामने खेळले आहेत. वनडेत त्याने ११ अर्धशतकांच्या मदतीने १८११ धावा काढल्या आहेत. तर टी-२०मध्ये २ अर्धशतकांसह  १०१३ धावा काढल्या आहेत. त्याशिवाय त्याने वनडेत ४६ आणि टी-२० मध्ये २८ बळी टिपले आहेत.  

टॅग्स :टी-20 क्रिकेटनेपाळ
Open in App