Join us  

IPL 2020 : ...तर अधिक रोमांचक होईल टी-20 क्रिकेट, सुनील गावसकरांनी दिला 'या' बदलांचा सल्ला

आजपर्यंत क्रिकेटच्या या प्रकारात फलंदाजांचा दबदबा बघायला मिळाला आहे. मात्र, गोलंदाजांसाठी फारसे काही नसते. यासंदर्भात, गोलंदाजांचा दबदबा निर्माण करण्यासाठी टी-20 क्रिकेटमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता वाटते का? या प्रश्नावर गावसकर म्हणाले...

By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 08, 2020 6:23 PM

Open in App

नवी दिल्ली - भारताचे दिग्गज क्रिकेट, माजी कर्णधार तथा सलामीवीर सुनील गावसकर यांनी टि-20 क्रिकेटसंदर्भात खास मत व्यक्त केले आहे. सध्या टी-20 क्रिकेट अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. यात कसल्याही प्रकारच्या बदलांची आवश्यकता नही. मात्र, यात एका ओव्हरमध्ये दोन बाउंसर टाकण्याची परवानगी दिली जाऊ शकते, असे गावसकर यांनी म्हटले आहे.

आजपर्यंत क्रिकेटच्या या प्रकारात फलंदाजांचा दबदबा बघायला मिळाला आहे. मात्र, गोलंदाजांसाठी फारसे काही नसते. यासंदर्भात, गोलंदाजांचा दबदबा निर्माण करण्यासाठी टी-20 क्रिकेटमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता वाटते का? या प्रश्नावर गावसकर म्हणाले, "टी-20 क्रिकेटमध्ये सध्या कसल्याही प्रकारच्या बदलाची आश्यकता नाही. क्रिकेटचा हा प्रकार फलंदाजांना अनुकूल आहे. अशात, वेगवान गोलंदाजांना दोन बाउंसर टाकण्याची परवानगी दिली जाऊ शकते. याच बरोबरच सीमारेशाही थोडी दूर असायला हवी. या शिवाय, पहिल्या तीन षटकांत बळी घेणाऱ्या गोलंदाजाला अधिकचे एक षटक टाकण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, क्रिकेटच्या या प्रकारात कसल्याही प्रकारच्या बदलाची आवश्यकता असल्याचे मला वाटत नाही."

IPL 2020: मंकड नाही, ब्राऊन म्हणा- गावसकरांचं भारतीयांना आवाहन

नियमांसंदर्भात बोलताना गावसकर म्हणाले, गोलंदाजाने चेंडू फेकण्यापूर्वी समोर उभा असलेला फलंदाज क्रीजमधून फार पुढे तर आला नाही, हे बघण्याचा अधिकार टीव्ही अंपायरला असायला हवा. तसेच, असे झाल्यास गोलंदाज त्या फलंदाजाला चेंडू फेकण्यापूर्वीच धावबाद करू शकतो. तसेच, ‘नॉन स्ट्राइक’वरील फलंदाज अधिक समोर आला असल्याचे टिव्ही अंपायरला जाणवल्यास आणि चौकार गेलेला असल्यासदेखील एक धाव कापण्याची शिक्षा दिली जाऊ शकते, असेही गावसकर यांनी म्हटले आहे.

आर. अश्विनचे केले कौतुक - यावेळी गावसकर यांनी ऑफ स्पिनर आर. अश्विनचे कौतुकही केले. अश्विनने आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्सदरम्यानच्या सामन्यात आरोन फिंचला क्रीजच्या बाहेर आल्यामुळे इशारा दिला होता, तसेच पुढच्या वेळी धावबाद करेन असेही सांगितले होते. गावसकर म्हणाले, अश्विनने, असे करून रिकी पाँटिंग प्रति आदर दाखवला आहे. पाँटिंगने अशा प्रकारच्या वेकेटसंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. याच बरोबर त्याने इशाराही दिला, की आता कुणीही क्रिजच्या बाहेर आल्यास तो धावबाद करेल.

IPL 2020: फलंदाज, गोलंदाजच नव्हे; क्षेत्ररक्षकांचेही योगदान- रोहित शर्मा

यावेळी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13व्या सत्राचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले आहे. भारतातील कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे यूएईमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत आतापर्यंत फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात बरोबरीचा सामना होताना दिसत आहे. या स्पर्धेत काही फलंदाजांनी शतकी खेळीही केली. तसेच अनेक वेळा काही गोलंदाजांनी आपल्या बळावर सामन्याचा रोखही संघाकडे वळवल्याचे दिसले आहे.

टॅग्स :सुनील गावसकरIPL 2020