Join us  

मंगोलिया संघ अवघ्या दहा धावांत झाला गारद

पुढील टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सुरु असलेल्या आशिया गटाच्या पात्रता फेरीत गुरुवारी आगळावेगळा विक्रम नोंदवला गेला. सिंगापूरविरुद्ध मंगोलिया संघ १० षटकांत केवळ १० धावांवर बाद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 6:05 AM

Open in App

बांगी - पुढील टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सुरु असलेल्या आशिया गटाच्या पात्रता फेरीत गुरुवारी आगळावेगळा विक्रम नोंदवला गेला. सिंगापूरविरुद्ध मंगोलिया संघ १० षटकांत केवळ १० धावांवर बाद झाला.

पुरुष आंतरराष्ट्रीय टी-२०तील हा नीचांक ठरला. सिंगापूरचा १७ वर्षांचा लेगस्पिनर हर्षा भारद्वाजने ३ धावांत ६ बळी घेतले. तोच ‘सामनावीर’ ठरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. मंगोलियाचे सहा फलंदाज पॉवर प्लेमध्ये गारद झाले. त्यातही पाच जण भोपळा न फोडताच परतले. सिंगापूरने फक्त पाच चेंडूंत हा सामना जिंकला. त्यांनी ११५ चेंडू शिल्लक राखून नऊ गड्यांनी विजय साजरा केला.

टॅग्स :आंतरराष्ट्रीय क्रिकेटटी-20 क्रिकेट