T20 Ind vs New : कर्णधार हरमनप्रीतचे तुफानी शतक, न्यूझीलंडला 195 धावांचे लक्ष्य

नाणेफेक जिंकून कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रथम फलंदाजी स्वीकारली. अवघ्या 40 धावांत तीन विकेट माघारी परतल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 10:07 PM2018-11-09T22:07:18+5:302018-11-09T22:54:46+5:30

whatsapp join usJoin us
T20 Ind vs New: Captain Harmanpreet's tifan century, New Zealand made 195 | T20 Ind vs New : कर्णधार हरमनप्रीतचे तुफानी शतक, न्यूझीलंडला 195 धावांचे लक्ष्य

T20 Ind vs New : कर्णधार हरमनप्रीतचे तुफानी शतक, न्यूझीलंडला 195 धावांचे लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

प्रोव्हिडन्स : भारतीय महिला संघाने आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची दणक्यात सुरुवात केली. जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी न्यूझीलंडसमोर 195 धावांचे आव्हान ठेवले. हरमनप्रीतने 51 चेंडूत 103 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यामध्ये 7 चौकार आणि 8 षटकारांची आतषबाजी केली.

नाणेफेक जिंकून कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रथम फलंदाजी स्वीकारली. अवघ्या 40 धावांत तीन विकेट माघारी परतल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडेल असे वाटले होते. या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या हेमलता दयालनला मोठी खेळी करण्यात अपयश आले. मात्र, मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने सुरुवातीला संयमी खेळ करून खेळपट्टीवर जम बसवला. हरमनप्रीतने फटकेबाजी करत संघाच्या धावांचा वेग वाढवला. भारताने पहिल्या 10 षटकांत 76 धावा केल्या होत्या. 



 

जेमिमा व हरमनप्रीत यांनी जम बसवत न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर प्रहार केला. हरमनप्रीतने मागून येऊन वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. तिने 33 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार खेचत अर्धशतक झळकावले. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. जेमिमानेही 39 चेंडूत अर्धशतक (6 चौकार) पूर्ण केले. दरम्यान, हरमनप्रीतचे टी-20 सामन्यातील हे पहिलेच शतक आहे.



 


या दोघींनी भारतीय संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. भारतीय महिलांनी सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध २० षटकांत 5 बाद 194 धावा चोपल्या. त्यामुळे न्यूझीलंड संघाला विजयासाठी 195 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.



 

Web Title: T20 Ind vs New: Captain Harmanpreet's tifan century, New Zealand made 195

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.