Join us

T20 Mumbai : अर्जुन तेंडुलकरला सूर गवसला, नॉर्थ मुंबई पँथर्सला धक्का बसला

T20 Mumbai: मुंबई ट्वेंटी-20 लीगमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरची चांगलीच धुलाई झाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 17:25 IST

Open in App

मुंबई : मुंबई ट्वेंटी-20 लीगमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरची चांगलीच धुलाई झाली होती. आकाश टायगर्स एमडब्लूएस संघाचे प्रतिनिधित्व करताना अर्जुनला सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही. सोबो सुपर सॉनिकच्या फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीवर खोऱ्याने धावा केल्या. पण, त्या अपयशातून धडा घेत अर्जुनने सोमवारी कमबॅक केले.

आकाश टायगर्स आणि नॉर्थ मुंबई पँथर्स यांच्यात सोमवारी सामना खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजीला आलेल्या पँथर्सने 20 षटकांत 6 बाद 169 धावा केल्या. कर्णधार विक्रांत औटीनं 37 चेंडूंत 52, तर विशाल धागांवकरने 26 चेंडूंत 46 धावांची खेळी करून पँथर्सला दमदार सुरुवात करून दिली. पण, मधल्या फळीला मोठी खेळी करता आली नाही. अर्जुननं त्यांची मधली फळीच नेस्तानाबूत केली. त्याने 3 षटकांत 27 धावांत 3 विकेट टिपले. 

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरसचिन तेंडुलकर