नवी दिल्ली - आयरलँड-भारत, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया आणि भारत-इंग्लंड आणि जिम्बाब्वेमध्ये झालेल्या तिरंगी टी-20 मालिकेनंतर आयसीसीने काल फलंदाजांची क्रमवारी जाहिर केली आहे. इंग्लंड विरोधातील शतकी खेळीचा केएल राहुलला 9 स्थानाचा फायदा झाला आहे. राहुलने 12 व्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानर झेप घेतली आहे. मात्र कर्णधार विराट कोहलीला चार स्थानाचे नुकसान झाले आहे. विराट कोहली प्रथमच टॉप10 मधून बाहेर फेकला गेला आहे. विराट कोहली सध्या 12 व्य क्रमांकावर आहे. इंग्लंड विरोधात तीन-20 सामन्याच्या मालिकेत सामानाविर पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या रोहित शर्माला दोन स्थानाचा फायदा झाला आहे. रोहित 11 व्या स्थानावर पोहचला आहे.
टॉप 10 फंलदाज :
क्रमवारी | नाव | देश | गुण |
1 | अॅरोन फिंच | ऑस्ट्रेलिया | 891 |
2 | फखर जमान | पाकिस्तान | 842 |
3 | केएल राहुल | भारत | 812 |
4 | कॉलिन मुन्रो | न्यूझीलंड | 801 |
5 | बाबर आजम | पाकिस्तान | 765 |
6 | ग्लेन मॅक्सवेल | ऑस्ट्रेलिया | 761 |
7 | एविन लूविस | वेस्टइंडीज | 753 |
8 | मार्टिन गप्टिल | न्यूझीलंड | 747 |
9 | एलेक्स हेल्स | इंग्लंड | 710 |
10 | डार्सी शॉर्ट | ऑस्ट्रेलिया | 690 |
वन-डेत भारताचे लक्ष्य अव्वल रँकिंगवरदुबई : इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने विजय मिळवल्यास भारतीय संघ आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान गाठू शकतो. इंग्लंड आणि भारत सध्या एकदिवसीय क्रमवारीमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसºया स्थानी आहे. मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना गुरुवारी नॉटिंघममध्ये होईल. दोन मेला भारताने एकदिवसीय क्रमवारीतील आपले अव्वल स्थान गमावले होते. हे स्थान पुन्हा मिळवण्याची भारताकडे संधी आहे. त्यासाठी भारताला इंग्लंडला 3-0 असे पराभूत करावे लागेल. तसेच इंग्लंडने भारताला याच फरकाने पराभूत केले तर ते आपली स्थिती मजबूत करतील. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही मालिका 17 जुलै रोजी संपेल.