- सुनील गावसकर भारताने विंडीजविरुद्ध कसोटी आणि वन-डे मालिका फारसा घाम न गळताच जिंकली. विशाखापट्टणम येथील सामना ‘टाय’ झाला तर पुण्यात पराभव पत्करावा लागल्यानंतरही भारताने अन्य तीन सामन्यांत विंडीजला एकतर्फी असेच पराभूत केले. जगभरात सुरू असलेल्या टी-२० लीगद्वारे विंडीजचे खेळाडू पैसा कमवित असल्यामुळे कसोटी आणि वन-डे संघात दमदार खेळाडूंचा भरणा नव्हता.विंडीजमध्ये क्रिकेटपटूंना करिअरमध्ये दर्जेदार नोकरी मिळेलच याची शाश्वती राहिली नसल्याने क्रिकेटमध्ये नामवंत होताच हे खेळाडू वर्तमान आणि भविष्याचा वेध घेत व्यावसायिक लीगद्वारे पैसा कमविण्यास पसंती देतात, हे समजू शकतो. टी-२० मालिकेसाठी मात्र काही दिग्गज संघासाठी उपलब्ध झाले आहेत. वेस्ट इंडिज आयसीसी टी-२० चॅम्पियनदेखील आहे. त्यामुळे कसोटी आणि वन-डे मालिकेसारखे टी-२० त सहज विजय मिळविणे भारताला सोपे जाणार नाही.तीन सामन्यांच्या मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहली दिसणार नाही. त्याच्या अनुपस्थितीतही भारत आशिया चषकाचा विजेता ठरला होता. टी-२० त विराटची अनुपस्थिती विंडीजसाठी मानसिकरित्या जमेची बाजू ठरावी. अशा स्थितीत भारतीय फलंदाजीवर दडपण आणण्याची संधी असेल. सुरुवातीची पडझड ही नवोदित भारतीय फलंदाजांसाठी अडचणीची ठरू शकेल. आयपीएलचा पुरेसा अनुभव राखणारे भारतीय खेळाडू अनुभवी आहेत, असे मानायला हरकत नाही. पण फ्रॅन्चायसी क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट यात बरीच तफावत आहे, भारताने संघात फिरकीपटूंचा अधिक भरणा केला. मोठी फटकेबाजी करणाऱ्या प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्याचा त्यांचा हेतू असावा, पण दमदार फटकेबाजी करणारे लयीत असतील तर कुणालाही जुमानत नाहीत, हेच खरे. या संघात महेंद्रसिंग धोनी हादेखील नाही. त्याच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांना संधी असेल. भविष्यातील संघात त्यांनी स्वत:चे स्थान निश्चित करायला हवे. याशिवाय कुणाल पांड्यालादेखील योग्यता सिद्ध करायची हीच संधी असेल. ही मालिका उभय संघातील युवा खेळाडूंसाठी व्यासपीठ आहे. याद्वारे आयपीएल फ्रॅन्चायसी आणि राष्ट्रीय निवडकर्त्यांना प्रभावित करता येईल. ही मालिका अत्यंत अटीतटीची होईल. याची सुरुवात कोलकाता येथील ईडन गार्डनवर होत आहे. (पीएमजी)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- टी-२० मालिका भारतासाठी सोपी नाही
टी-२० मालिका भारतासाठी सोपी नाही
भारताने विंडीजविरुद्ध कसोटी आणि वन-डे मालिका फारसा घाम न गळताच जिंकली. विशाखापट्टणम येथील सामना ‘टाय’ झाला तर पुण्यात पराभव पत्करावा लागल्यानंतरही भारताने अन्य तीन सामन्यांत विंडीजला एकतर्फी असेच पराभूत केले.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 4:28 AM