Join us  

T20 Tri-series: नव्या सुरुवातीस भारतीय महिला संघ सज्ज, आॅस्ट्रेलियाविरुद्ध सलामीचा सामना

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आॅस्ट्रेलियाकडून दारुण पराभूत झालेला भारतीय महिला संघ गुरुवारपासून सुरू होत असलेल्या टी-२० तिरंगी मालिकेत नव्याने उभारी घेण्यास सज्ज झाला आहे. या स्पर्धेत इंग्लंड संघाचाही समावेश आहे. सर्व सामने सीसीआयच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळले जातील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 6:01 AM

Open in App

मुंबई: तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आॅस्ट्रेलियाकडून दारुण पराभूत झालेला भारतीय महिला संघ गुरुवारपासून सुरू होत असलेल्या टी-२० तिरंगी मालिकेत नव्याने उभारी घेण्यास सज्ज झाला आहे. या स्पर्धेत इंग्लंड संघाचाही समावेश आहे. सर्व सामने सीसीआयच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळले जातील.भारताने याआधी द. आफ्रिका संघावर पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने विजय साजरा केला पण त्यानंतर झालेल्या एकदिवसीय मालिकेत आॅस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. अशावेळी हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची वाटचाल सोपी ठरणार नाही. आॅस्ट्रेलियाविरुद्ध सलगपणे अर्धशतके ठोकणाऱ्या स्मृती मानधनाकडून कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा राहील. याशिवाय हरमनप्रीत आणि मिताली राज यांच्यावर धावा काढण्याची मोठी जबाबदारी आहे. वेदा कृष्णमूर्ती आणि पूजा वस्त्रकार तसेच युवा जेमिमा रॉड्रिग्ज यांच्याकडूनही धावा अपेक्षित आहेत. दुखापतीतून सावरल्यानंतर अनुभवी वेगवान गोलंदाज झूलन संघात परतल्याने गोलंदाजी भक्कम झाली. सोबत शिखा पांडे ही वेगवान गोलंदाज असून दिप्ती शर्मा आणि पूनम यादव यांचा फिरकी मारा प्रतिस्पर्धी फलंदाजांना कसा चकवितो यावर विजयाचे समीकरण विसंबून असेल.गायकवाडला संधी : फिरकीपटू एकता बिष्ट अद्यापही दुखापतीतून सावरली नसल्याने राजेश्वरी गायकवाड हिची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. वडोदरा येथे झालेल्या आॅस्टेÑलियाविरुद्धच्या तिसºया एकदिवसीय सामन्यात बिष्टला दुखापत झाली होती आणि तिला दहा दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता.दुसरीकडे मेग लेनिंग हिच्या नेतृत्वात आॅस्ट्रेलियाला विजयी कूच कायम राहील, अशी अपेक्षा आहे. यष्टिरक्षक - फलंदाज एलिसा हिली हिने तिसºया एकदिवसीय सामन्यात भारताविरुद्ध १३३ धावा ठोकल्या होत्या. डावखुरी फिरकी गोलंदाज जेस जोनासन हिने भारतीय खेळाडूंना फार त्रास दिला होता. तिच्या माºयापासून सावध राहावे लागेल.वेगवान प्रकारात सर्वच संघ समान असल्याने भारताला कमी लेखण्याची चूक करणार नाही. या प्रकारात भारत आणि इंग्लंडचा संघ चांगलाच आहे. त्यामुळे विजयासाठी चांगला खेळ करावा लागेल. ब्रेबॉर्नच्या खेळपट्टीवर भरपूर धावा निघतील, असा माझा अंदाज आहे.’’ - मेग लेनिंग, कर्णधार आॅस्ट्रेलिया.आमचा संघ फार अनुभवी नसलातरी इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरीसाठी कुठलीही कसर ठेवणार नाही. टी-२० प्रकारात नियमित खेळणारे इंग्लंड- आॅस्ट्रेलिया आमच्या तुलनेत अनुभवी आहेत. आम्ही त्यांच्यासारखे दमदार होण्याचा प्रयत्न करीत असून संघ म्हणून आम्ही शिकण्याच्या प्रक्रियेत आहोत. विश्वचषकाची तयारी करताना जे आव्हान पुढे येते ते सर करणे आमचे कर्तव्य आहे.- हरमनप्रीत कौर, कर्णधार भारत.प्रतिस्पर्धी संघ :भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार),स्मृती मानधना (उपकर्णधार), मिताली राज, वेदा कृष्णमूर्ती, झेमिमा रॉड्रिÑग्स, अनुजा पाटील, दीप्ति शर्मा, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), पूनम यादव, एकता बिष्ट, झुलन गोस्वामी, शिखा पांडे , पूजा वस्त्रकार, रुमेली धर, मोना मेश्राम.आॅस्ट्रेलिया: मेग लेनिंग (कर्णधार),राचेल हेन्स (उपकर्णधार), निकोला केरी, एशली गार्डनर, एलिसा हिली, जेस जोनासन, डेलिसा किमिस, सोफी मोलाइनिन, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शट, नाओमी स्टालेनबर्ग, एलेस विलानी, अमांडा-झेड वेलिंग्टन.

टॅग्स :क्रिकेट