Join us

टी२० तिरंगी मालिका; कोहलीला विश्रांती मिळण्याची शक्यता, स्टार खेळाडूंशिवाय खेळणार भारत?

ही तिरंगी टी२० मालिका ६ ते १८ मार्चदरम्यान होणार असून, त्यात तिसरा संघ बांगलादेश असणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 05:16 IST

Open in App

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेतील दौ-यानंतर टीम इंडिया आता श्रीलंका दौ-यावर जाणार आहे. तथापि, हा संघ या वेळेस कसोटी आणि वनडे मालिकेसाठी नाही, तर तिरंगी टी-२0 मालिकेत सहभागी होणार आहे. ही तिरंगी टी२० मालिका ६ ते १८ मार्चदरम्यान होणार असून, त्यात तिसरा संघ बांगलादेश असणार आहे.या दौºयासाठी भारतीय संघाची निवड शनिवार अथवा रविवारी होऊ शकते. तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघ निवडण्यासाठी एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची बैठक होईल तेव्हा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह तसेच कर्णधार विराट कोहलीच्या सहभागावर विशेष चर्चा होण्याची शक्यता आहे.विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेतील सर्वच सामने खेळले आहेत. अशात त्याने जर विश्रांतीची मागणी केल्यास त्याला संघाबाहेर ठेवले जाऊ शकते. तथापि, तिरंगी मालिकेत खेळण्याचा अथवा न खेळण्याचा निर्णय विराटवर सोपवला जाऊ शकतो.बीसीसीआयच्या एका अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, ‘जर विराटने विश्रांतीची मागणी केल्यास त्याला विश्रांती दिली जाईल. तिरंगी मालिकेत खेळणे अथवा नाही याविषयी विराटच निर्णय घेईल; परंतु कदाचित या हंगामातील ही शेवटची स्पर्धा असल्यामुळे कदाचित तो खेळूही शकेल. ही स्पर्धा संपल्यानंतर विराटला स्वत:ला ताजेतवाने ठेवण्यासाठी आयपीएलआधी १५ दिवसांचा वेळ मिळणार आहे.’आयपीएलचे प्रदीर्घ सत्र पाहता वेगवान गोलंदाज भुवनेश्वर आणि बुमराह यांना विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता आहे. या दोघांनी कसोटी, वनडे आणि टष्ट्वेंटी-२0 या तिन्ही स्वरूपात शानदार कामगिरी केली. भुवनेश्वरने कसोटी आणि एकदिवसीय मालिका मिळून जवळपास १00 षटके टाकली आहेत. त्याने टी-२0 आंतरराष्ट्रीयमध्येही आपला पूर्ण कोटा गोलंदाजी केल्यास ११२ षटके होतील. विशेष म्हणजे कोणीही बुमराहपेक्षा जास्त गोलंदाजी केली नाही. बुमराह हा कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्यासह दौºयात आतापर्यंत सर्वच सर्व सामने खेळणाºया तीन खेळाडूंपैकी एक आहे. जर बुमराह टी-२0 मालिकेत पूर्ण कोटा गोलंदाजी केल्यास तो १६२ पेक्षा जास्त षटके गोलंदाजी करील.भारताला आगामी सत्रात ३0 वनडेसह ६३ आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत आणि बुमराहच्या तंदुरुस्तीला निवड समिती व संघ व्यवस्थापनाची प्राथमिकता असेल. जर बुमराह आणि भुवी यांना विश्रांती दिली गेल्यास शार्दूल ठाकूर व जयदेव उनाडकट यांच्यावर नवीन चेंडू टाकण्याची जबाबदारी असेल.केरळचा यॉर्करतज्ज्ञ बासील थम्पी हा श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या टी-२0 मालिकेत राखीव खेळाडू होता आणि भुवनेश्वर व बुमराह यांच्यापैकी कोणा एकाला विश्रांती दिली गेल्यास कदाचित तो संघात पुनरागमन करू शकतो.

टॅग्स :विराट कोहली