Join us  

T20 WC 24, Semi Final 1, AFG vs SA : अफगाणिस्तान ५६ वर ALL OUT! आफ्रिकेला फायनलचे तिकीट मिळवण्याची सुवर्णसंधी

South Africa vs Afghanistan Live Match Updates : दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करून अफगाणिस्तानला अवघ्या ५६ धावांत सर्वबाद केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 7:16 AM

Open in App

AFG vs SA T20 World Cup 2024 Semi-final : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ भिडले. सुरुवातीपासून चमकदार कामगिरी करून उपांत्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघाला पहिल्या उपांत्य सामन्यात काहीच खास करता आले नाही. त्यांचा संघ अवघ्या ५६ धावांत गारद झाल्याने दक्षिण आफ्रिकेला प्रथमच विश्वचषकाच्या फायनलमध्ये जाण्याची सुवर्णसंधी आहे. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी केवळ ५७ धावांची आवश्यकता आहे. 

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ ११.५ षटकांत ५६ धावांत सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅनसेन आणि तबरेझ शम्सी यांनी सर्वाधिक ३-३ बळी घेतले. याशिवाय कगिसो रबाडा आणि एनरिक नॉर्तजे यांनी प्रत्येकी २-२ बळी घेऊन अफगाणिस्तानच्या फलंदाजीची कंबर मोडली. तर अफगाणिस्तानकडून अजमतुल्लाह उमरजईने सर्वाधिक १० धावा केल्या. उमरजई हा अफगाणिस्तानच्या संघासाठी दुहेरी आकडा पार करणारा एकमेव फलंदाज ठरला. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना आफ्रिकेच्या संघाने सांघिक कामगिरी केली. त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला अवघ्या ५६ धावांवर रोखले. 

दक्षिण आफ्रिकेची घातक गोलंदाजी

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या घातक गोलंदाजीसमोर कोणत्याच फलंदाजाचा टिकाव लागला नाही. अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरबाज (०), इब्राहिम झादरान (२), गुलाबदीन नायब (९), अजमतुल्लाह उमरजई (१०), मोहम्मद नबी (०), नांगेलिया खरोटे (२), करीम जनत (८), राशिद खान (८), नूर अहमद (०), नवीन-उल-हक (२) आणि फझलहक फारूकीने नाबाद २ धावा केल्या. याशिवाय १३ अतिरिक्त धावांच्या जोरावर अफगाणिस्तानने ५० हून अधिक धावा उभारल्या. 

अफगाणिस्तानचा संघ - राशिद खान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरान, अजमतुल्लाह उमरजई, गुलाबदीन नायब, मोहम्मद नबी, करीम जनत, नांगेयालिया खारोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक, फझलहक फारूकी. 

दक्षिण आफ्रिकेचा संघ -एडन मार्करम (कर्णधार), क्विंटन डीकॉक, रिजा हेन्ड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्तजे, तबरेज शम्सी. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024अफगाणिस्तानद. आफ्रिका