Join us  

T20 WC 2024 : पोलार्ड इंग्लंडच्या ताफ्यात! गतविजेत्यांना पुन्हा एकदा चॅम्पियन करण्यासाठी मैदानात

Kieron Pollard England : किरॉन पोलार्ड ट्वेंटी-२० विश्वचषकात इंग्लंडच्या विजयासाठी झटताना दिसेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 10:59 AM

Open in App

T20 World Cup 2024 वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू किरॉन पोलार्ड ट्वेंटी-२० विश्वचषकात इंग्लंडच्या विजयासाठी झटताना दिसेल. पोलार्ड सहकारी प्रशिक्षक म्हणून इंग्लिश संघासोबत कार्यरत आहे. ३७ वर्षीय पोलार्ड इंग्लिश संघाच्या सराव सत्रात बार्बाडोस येथे दिसला होता. गतविजेच्या इंग्लंडने अलीकडेच पाकिस्तानविरूद्ध २-० ने मोठा विजय मिळवला. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर पोलार्डचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो सराव सत्रात खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसत आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये मॅथ्यू मॉटचा कार्यकाळ संपल्यानंतर पोलार्डने इंग्लंड बोर्डाने आपल्या संघाचा फलंदाजी प्रशिक्षक बनवले. पोलार्डच्या मार्गदर्शनाखाली इंग्लिश संघ अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होत असलेला ट्वेंटी-२० विश्वचषक खेळत आहे. पोलार्डच्या मायदेशात होत असलेल्या विश्वचषकामुळे त्याला तेथील मैदानांचा अंदाज आहे. 

पोलार्ड इंग्लंडच्या ताफ्यात

पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०१ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये कॅरेबियन संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१२ मध्ये संघाच्या ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आणि २०२१ च्या आवृत्तीत तो कर्णधार म्हणून खेळला. २०२२ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, पोलार्ड जगभरातील अनेक ट्वेंटी-२० फ्रँचायझी लीगमध्ये सक्रिय आहे आणि वेगवेगळ्या भूमिका बजावतो.

इंग्लंडचा संघ -जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टन, आदिल राशिद, फिल सॉल्ट, रीस टोप्ली, मार्क वुड.

विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा. 

विश्वचषकासाठी चार गट - 

अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ

टॅग्स :किरॉन पोलार्डवेस्ट इंडिजइंग्लंडट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024