टी-२० वर्ल्डकपमध्ये शुक्रवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने स्कॉटलंडचा पराभव केला. भारतीय गोलंदाजांनी जहरदस्त बॉलिंग करत स्कॉटलंडला कमी धावसंख्येवर रोखले. तसेच भारतीय फलंदाजांनी सेमीमध्ये जाण्यासाठी रनरेटसाठी आवश्यक असलेल्या कमी ओव्हरमध्ये हे लक्ष्य पार केले.
या सामन्य़ाची आणखी एक कास बाब म्हणजे, भारतीय गोलंदात शमीने एकाच ओव्हरच्या तीन बॉलवर तीन विकेट घेतल्या, परंतू ती हॅट्ट्रीक म्हणून नोंद झाली नाही.
ती १७ वी ओव्हर होती, मोहम्मद शमी बॉलिंग टाकायला आला होता. पहिल्याच चेंडूवर त्याने सी. मैकलिओडला क्लिन बोल्ड केले. त्यानंतर आलेल्या एस शरीफने दुसऱ्या चेंडूवर टच करून रन घेण्याचा प्रयत्न केला. परंतू इशान किशनने त्याला रन आऊट केले.
यानंतर लगेचच तिसऱ्या बॉलवर मोहम्मद शमीने आणखी एक विकेट घेतला. ए. एवन्सला देखील बोल्ड केले. याचबरोबर टीम इंडियाला तीन बॉलवर ती विकेट मिळाले, परंचू हॅट्ट्रीक झाली नाही. कारण मधला जो विकेट होता तो रन आऊट होता.
गोलंदाजांची कामगिरी...
मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं स्कॉटलंडला गुडघे टेकण्यास भाग पाडले. त्यानंतर रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी तुफान फटकेबाजी करताना भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. ही दोघं समोर आलेला प्रत्येक चेंडू सीमारेषेपार सहजतेनं टोलवंत होते. भारताला हा सामना ७.१ षटकांत जिंकायचा होता, परंतु त्यांनी त्यापेक्षा कमी षटकांतच बाजी मारून. जसप्रीत बुमराहनं ३.४ षटकांत १० धावा देत २ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजा ( ३-१५) नं ट्वेंटी-२०तील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली, तर मोहम्मद शमीनं ३ षटकांत १ निर्धाव षटक फेकताना १५ धावांत तीन विकेट्स घेतल्या. बुमराहनं ५४ सामन्यांत ६४ विकेट्स घेताना ट्वेंटी-२०त सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचा मान पटकावला. युझवेंद्र चहल ६३ विकेट्ससह आघाडीवर होता. आर अश्विननं २९ धावांत १ विकेट घेतली. स्कॉटलंडकडून जॉर्ज मुन्सी ( २४), मिचेल लिस्क ( २१) हे चांगले खेळले. स्कॉटलंडचा संपूर्ण संघ १७.४ षटकांत ८५ धावांवर माघारी परतला.
Web Title: T20 WC, Ind Vs Sco: Team India got three wickets in three balls, but did not a hat trick ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.