ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) आणि संलग्न संघटना यांच्यात बुधवारी पाच तासांहून अधिक चर्चा झाली. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवर अनिश्चितितेचं सावट आहे. ही स्पर्धा स्थगित झाल्यास त्या कालावधीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीग खेळवण्याचा विचार करत आहे. त्यामुळे ही बैठकी आयपीएलच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची होती. पण, या बैठकीत पुन्हा एकदा आयसीसीनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप संदर्भात आयसीसी अजूनही आशावादी असून परिस्थितीवर अजून एक महिना लक्ष ठेवण्यात येणार असून पुढील महिन्यात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे एकमत आजच्या बैठकीत झाले.
या बैठकीत ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसह 2021मध्ये होणाऱ्या महिलांच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेबाबतही चर्चा करण्यात आली. पुढील महिनाभर परिस्थितीवर लक्ष ठेवल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे आयसीसीनं स्पष्ट केलं. सध्याच्या वेळापत्रकानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणे अपेक्षित आहे आणि आयसीसीही त्यासाठी आग्रही आहे. त्यासाठी आयसीसी ऑस्ट्रेलियन सरकार आणि तेथील आरोग्य प्रशासनासोबत सातत्यानं चर्चा करत आहे. खेळाडू आणि प्रेक्षक यांच्या आरोग्याला प्राधान्य असेल, हे आयसीसीनं स्पष्ट केलं.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी मनू सव्हनेय यांनी सांगितले की,''कोरोना व्हायरसचा धोका वाढत चालला आहे आणि त्यामुळे योग्य निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आरोग्य याला आमचे प्राधान्य असेल. निर्णय घेण्याची एकच संधी मिळणार आहे आणि त्यामुळे तो योग्य असावा, असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही सर्व संलग्न संघटना, ब्रॉडकास्टर, पार्टनर, सरकार आणि खेळाडूंचा सल्ला घेत आहोत.''
बीसीसीआयला दिलासाकर सवलतीचा मुद्दा या बैठकीत चर्चिला गेला. त्यानुसार बीसीसीआयला डिसेंबर 2020 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
महेंद्रसिंग धोनीनं दिलं पक्ष्याला जीवदान; कन्येनं सांगितली संपूर्ण हकिकत!
पाकिस्ताननं 'आशिया चषक' आयोजनाचा हट्ट सोडला; या देशात होणार यंदाची स्पर्धा!
शोएब अख्तरनं निवडले टॉप 10: भारत-पाकिस्तान ऑल टाईम खेळाडूंमध्ये धोनी, गांगुली यांना स्थान नाही
बाबो; ऐतिहासिक विजयाच्या आनंदात 'तिनं' केलं न्यूड फोटोशूट; सोशल मीडियावर धुमाकूळ
चिनी वस्तूंसह हिच्यावरही बहिष्कार घाला; ट्विटमध्ये आपला फोटो पाहून ज्वाला गुट्टा खवळली
अरे देवा: विम्बल्डन विजेता 73 व्या वर्षी चढला बोहोल्यावर; 30 वर्षांनी लहान आहे पाचवी पत्नी!