टी२० महिला क्रिकेट: भारताने दिले इंग्लंडला विजयाचे ‘गिफ्ट’

अखेरच्या सामन्यात पाहुणा संघ एका धावेने विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 01:33 AM2019-03-10T01:33:02+5:302019-03-10T01:33:13+5:30

whatsapp join usJoin us
T20 Women's Cricket: England give India a 'gift' to victory | टी२० महिला क्रिकेट: भारताने दिले इंग्लंडला विजयाचे ‘गिफ्ट’

टी२० महिला क्रिकेट: भारताने दिले इंग्लंडला विजयाचे ‘गिफ्ट’

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गुवाहाटी : विजयाच्या उंबरठ्यावर असताना भारतीय महिला संघाला इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या व अखेरच्या टी२० सामन्यात एका धावेने पराभव स्वीकारावा लागला. यासह मालिकेत भारतीय संघाला ३-० ने क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले. भारतीय गोलंदाजांनी शानदार मारा करुन इंग्लंडला कमी धावसंख्येत रोखल्यानंतरही भारतीय फलंदाजांना त्याचा फायदा घेता आला नाही.

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ११९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला ११८ धावा करता आल्या. भारताला अखेरच्या षटकात ३ धावांची गरज होती आणि मिताली राज ३२ चेंडूंमध्ये ३० धावा काढून खेळत होती, पण ती दुसऱ्या टोकावर राहिली. केट क्रॉसने अखेरच्या षटकात तिला एकही चेंडू खेळण्याची संधी दिली नाही. भारती फुलमाळीने (५ धावा, १३ चेंडू) अखेरच्या षटकातील पहिले तीन चेंडू निर्धाव खेळल्यानंतर चौथ्या चेंडूवर बाद झाली. नवी फलंदाज अनुजा पाटीलने पुढच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात ती यष्टिचित झाली. ६ चेंडूवर ३ धावांची गरज असताना भारताला एका चेंडूवर तीन धावा आवश्यक होत्या. शिखा पांडेला केवळ एक धाव घेता आली. मिताली दुसºया टोकावर केवळ हे नाटक बघत राहिली. कर्णधार आणि हुकमी फलंदाज स्मृती मानधनाने ३९ चेंडूत ८ चौकार व एका षटकारासह ५८ धावांची जबरदस्त खेळी केली. मात्र अखेरच्या षटकात फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारताला हातातील सामना गमवावा लागला.



त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाºया इंग्लंड संघाने ६ बाद ११९ धावांची मजल मारली. टॅमी ब्युमोंट व डॅनियले वियाट यांनी ५१ धावांची भागीदारी केली. अनुजा पाटील, हरलीन देओल यांनी प्रत्येकी २ बळी घेत इंग्लंडला फटकेबाजी रोखले होते. भारताला पहिल्या लढतीत ४१ धावांनी तर दुसºया लढतीत ५ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता. (वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (महिला) : २० षटकात ६ बाद ११९ धावा (तास्मिन ब्युमोंट २९, अ‍ॅमी जोन्स २६, डॅनियल वॅट २४; अनुजा पाटील २/१३, हरलीन देओल २/१३) वि.वि. भारत (महिला) : २० षटकात ६ बाद ११८ धावा (स्मृती मानधना ५८, मिताली राज नाबाद ३०; कॅथरिन क्रॉस २/१८.)

Web Title: T20 Women's Cricket: England give India a 'gift' to victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.