Team India meet PM Modi Video: भारतीय संघाच्या विश्वविजेत्या शिलेदारांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. टीम इंडियाने टी२० विश्वचषकाची फायनल जिंकली. आफ्रिकेला सात धावांनी मात देत टीम इंडियाने १७ वर्षांनी पुन्हा एकदा टी२० वर्ल्डकप जिंकला. या ऐतिहासिक विजयानंतर T20 World Cup ची ट्रॉफी घेऊन टीम इंडिया (Indian Cricket Team) आज मायदेशी परतली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी विराट कोहली, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, इतर खेळाडू, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, त्याचा सपोर्ट स्टाफ आणि इतर स्टाफ यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी टीम इंडियाने घेतलेल्या भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये PM मोदी यांनी विश्वचषक ट्रॉफी आणि सर्व खेळाडूंसह फोटो काढला. तसेच खेळाडूंनी जवळपास दीड तास मोदींशी गप्पा मारताना विश्वचषकातील आठवणींना उजाळा दिला. पाहा व्हिडीओ-
भारतीय संघ पहाटे बार्बाडोसवरून साडेचारच्या सुमारास विशेष विमानाने भारताच्या दिशेने रवाना झाला. भारतीय संघाला मायदेशी आणण्यासाठी विशेष विमान बार्बाडोसला पाठवण्यात आले. त्याचा व्हिडिओ वृत्तसंस्थेने शेअर केला होता. AIC24WC (Air India Champions 24 World Cup) नावाचे एअर इंडियाचे विशेष चार्टर विमान तेथे गेले होते. भारतीय संघ, त्यांचे सहाय्यक कर्मचारी, खेळाडूंचे कुटुंबीय आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) काही अधिकारी आणि भारतीय प्रसारमाध्यमे यांना परत आणण्यासाठी हे विमान पाठवले होते. चक्रीवादळामुळे हे सर्व जण तेथे अडकून पडले होते. अखेर आज भारतीय संघ सकाळी ६ वाजता भारतात दाखल झाला. दिल्लीकरांचे स्वागत स्वीकारल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्यानंतर विजय मिरवणुकीसाठी संघ मुंबईला रवाना झाला.
Web Title: T20 World Champions Team India met PM Modi lots of discussions had laughter fun video goes viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.