ICC T20 World Cup 2021, Australia vs Sri Lanka, Scorecard Live Updates : श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १५५ धावांचं आव्हान ठेवलं आहे. श्रीलंकेकडून एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलं नाही. कुशल परेरा आणि चरीथ असलंगा यांनी सर्वाधिक प्रत्येकी ३५ धावांचं योगदान दिलं. तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेर स्टार्क, पॅट कमिन्स आणि फिरकीपटू अॅडम झम्पा यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केलं.
सामन्याची नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अरोन फिंच यानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या सुरुवातीच्या फळीचा फॉर्म याही सामन्यात डळमळीत झालेला पाहायला मिळाला. सलामीवीर पी.निस्संका अवघ्या ७ धावा करुन माघारी परतला. त्यानंतर कुशल परेरा आणि असलंगा यांनी सावध खेळी करत संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. परेरानं २५ चेंडूत ३५ आणि असलंगानं २७ चेंडूत ३५ धावा केल्या. अविश्का फर्नांडो (४), हसरंग डीसिल्वा (४), दसुन शनाका (१२) अपयशी ठरले. भानुका राजपक्षेनं २६ चेंडूत नाबाद ३३ धावांचं योगदान देत संघाला १५० धावांचा आकडा प्राप्त करुन दिला. तर चमिका करुणारत्ने ९ धावांवर नाबाद राहिला. २० षटकांच्या अखेरीस श्रीलंकेला ६ बाद १५४ धावा करता आल्या आहेत.
Web Title: T20 World Cup 2021 AUS vs SL Live sri lanka set 155 runs target against australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.