Join us  

T20 World Cup 2021, AUS vs SL Live: ऑस्ट्रेलियानं लंकेला लोळवलं, ७ विकेट्सं दणदणीत विजय

ICC T20 World Cup 2021, Australia vs Sri Lanka, Scorecard Live Updates : श्रीलंकेनं दिलेलं १५५ धावांचं आव्हान १८ चेंडू आणि सात विकेट्स राखून पूर्ण केलं आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 10:52 PM

Open in App

ICC T20 World Cup 2021, Australia vs Sri Lanka, Scorecard Live Updates : श्रीलंकेनं दिलेलं १५५ धावांचं आव्हान १८ चेंडू आणि सात विकेट्स राखून पूर्ण केलं आहे. विजयासह ऑस्ट्रेलिया आता 'अ' गटात ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडच्या खात्यातही ४ गुण असले तरी नेट रनरेटच्या जोरावर संघ पहिल्या स्थानावर आहे. 

श्रीलंकेच्या १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी खणखणीत सुरुवात केली. कर्णधार अरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांना चांगला सूर गवसल्याचं पाहायला मिळालं. दोघांनी सलामीसाठी ७० धावांची भागीदारी रचली. डेव्हिड वॉर्नरनं ४२ चेंडूत १० चौकारांच्या साथीनं ६५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. तर फिंचनं २३ चेंडूत ३७ धावांचं योगदान दिलं. मॅक्सवेल यावेळी मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला. मॅक्सवेल ५ धावांवरच माघारी परतला. स्टीव्ह स्मिथ नाबाद २८ आणि मार्कस स्टॉयनिस नाबाद १६ यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. श्रीलंकेकडून हसरंगा डीसिव्हानं ४ षटकांत २२ धावांच्या मोबदल्यात २ गडी बाद केले. तर शनाकानं १ विकेट मिळवली. 

श्रीलंकेच्या सुरुवातीच्या फळीचा फॉर्म याही सामन्यात डळमळीत झालेला पाहायला मिळाला. सलामीवीर पी.निस्संका अवघ्या ७ धावा करुन माघारी परतला. त्यानंतर कुशल परेरा आणि असलंगा यांनी सावध खेळी करत संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. परेरानं २५ चेंडूत ३५ आणि असलंगानं २७ चेंडूत ३५ धावा केल्या. अविश्का फर्नांडो (४), हसरंग डीसिल्वा (४), दसुन शनाका (१२) अपयशी ठरले. भानुका राजपक्षेनं २६ चेंडूत नाबाद ३३ धावांचं योगदान देत संघाला १५० धावांचा आकडा प्राप्त करुन दिला होता. तर चमिका करुणारत्ने ९ धावांवर नाबाद राहिला. २० षटकांच्या अखेरीस श्रीलंकेला ६ बाद १५४ धावा करता आल्या होत्या.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१आॅस्ट्रेलियाश्रीलंका
Open in App