T20 World Cup 2021, AUS vs SL Live: ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, श्रीलंकेच्या संघात घातक गोलंदाजाचं पुनरागमन

ICC T20 World Cup 2021, Australia vs Sri Lanka, Scorecard Live Updates : ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात लढत होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 07:13 PM2021-10-28T19:13:09+5:302021-10-28T19:30:00+5:30

whatsapp join usJoin us
t20 world cup 2021 australia vs sri lanka live updates scorecard  | T20 World Cup 2021, AUS vs SL Live: ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, श्रीलंकेच्या संघात घातक गोलंदाजाचं पुनरागमन

T20 World Cup 2021, AUS vs SL Live: ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, श्रीलंकेच्या संघात घातक गोलंदाजाचं पुनरागमन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC T20 World Cup 2021, Australia vs Sri Lanka, Scorecard Live Updates : ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात लढत होत आहे. दुबईच्या स्टेडियमवर खेळविण्यात येत असलेल्या या साखळी सामन्याची नाणेफक ऑस्ट्रेलियानं जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर श्रीलंकेच्या संघात फिरकीपटू महेश तेक्षाना याचं पुनरागमन झालं आहे.

श्रीलंकेनं २०१४ साली ट्वेन्टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. पण यावेळी त्यांना पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागला. तिन्ही सामने जिंकून मुख्य फेरीत प्रवेश करताच संघानं मुख्य फेरीच्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशला मात दिली आहे. दुसरीकडे आतापर्यंत ट्वेन्टी-२० वर्ल्डकप जिंकू न शकलेल्या ऑस्ट्रेलियानं सलामीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला नमवलं आहे. 

AUS vs SL:

Australia Playing XI: D Warner, A Finch(c), M Marsh, S Smith, G Maxwell, M Stoinis, M Wade(w), P Cummins, M Starc, A Zampa, J Hazlewood

Sri Lanka Playing XI: K Perera(w), P Nissanka, C Asalanka, A Fernando, W Hasaranga, B Rajapaksa, D Shanaka(c), C Karunaratne, D Chameera, L Kumara, M Theekshana

Web Title: t20 world cup 2021 australia vs sri lanka live updates scorecard 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.