Join us  

२०२१चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारतातून UAEत शिफ्ट होणार; पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा दावा

२०२०चा वर्ल्ड कप रद्द झाल्यानंतरही भारताने २०२१च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद कायम राखले. पण, आता भारतात पुन्हा कोरोना व्हायरल डोकं वर काढताना दिसत आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाटही आलेली पाहायला मिळते.

By स्वदेश घाणेकर | Published: December 01, 2020 1:10 PM

Open in App
ठळक मुद्देभारतात २०२१चा, तर ऑस्ट्रेलियात २०२२चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहेपाकिसतानी खेळाडूंना व्हिसा मिळावा यासाठी PCBची BCCI व ICCकडे विनंती

भारतात पुढील वर्षी होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप UAEत शिफ्ट होईल, असा दावा पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे ( PCB) CEO वासीम खान यांनी केला आहे. कोरोना व्हायरसमुळे भारतात २०२१चा वर्ल्ड कप होणार नसल्याचेही खान म्हणाले. कोरोनामुळे ऑस्ट्रेलियात यंदा होणारा वर्ल्ड कप रद्द करावा लागला आणि २०२२मध्ये ऑस्ट्रेलियाला पुन्हा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे.

२०२०चा वर्ल्ड कप रद्द झाल्यानंतरही भारताने २०२१च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद कायम राखले. पण, आता भारतात पुन्हा कोरोना व्हायरल डोकं वर काढताना दिसत आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाटही आलेली पाहायला मिळते. याचाच आधार घेत खान यांनी भारतात पुढील वर्षी वर्ल्ड कप आयोजन करण्याची परिस्थिती दिसत नसल्याचा दावा केला. ''पुढील वर्षी भारतात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. कारण, तेथील कोरोना परिस्थिती... त्यामुळे पुढील वर्षी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप UAEला शिफ्ट होऊ शकतो,''असे खान म्हणाले. 

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येमुळे यंदाची इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2020) BCCIनं UAEत खेळवली. २०२१मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे आणि त्यानंतर ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळावा, यासाठी खान यांनी ICC व BCCI कडे विनंती केली होती. 

भारतीय संघ जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत १४ कसोटी, १६ वन डे व २३ ट्वेंटी-20 सामने खेळणार आहेत. त्याव्यतिरिक्त आशिया चषक ट्वेंटी-20 ( जून), आयसीसी वर्ल्ड कप ( ऑक्टोबर) आणि आयपीएल 2021 हे आहेच.  ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून जानेवारी मायदेशात परतल्यानंतर टीम इंडिया दोन महिने इंग्लंड संघाचा पाहुणचार घेणार आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून त्यात ४ कसोटी, ४ वन डे व ४ ट्वेंटी-20 सामने होतील. मार्च ते मे या कालावधीत आयपीएल 2021चे आयोजन करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे.

टॅग्स :आयसीसीआयसीसी विश्वचषक टी-२०भारतपाकिस्तानसंयुक्त अरब अमिराती