Euro 2020 स्पर्धेत पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Cristiano Ronaldo) यानं पत्रकार परिषदेसाठीच्या टेबलवर ठेवण्यात आलेली Coca Colaची बॉटल समोरून हटवली अन् कंपनीला ४ अब्ज डॉलर्सचा नुकसान सहन करावं लागलं. फिटनेसच्या बाबतीत सध्याच्या घडीतील खेळाडूंमध्ये आघाडीवर असलेला रोनाल्डो शीतपेय पित नाही आणि त्यामुळे त्यानं तशी कृती केली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही रोनाल्डोची नकल करण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) यानंही श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर केला.
गुरूवारी ऑस्ट्रेलियानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेचा पराभव करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. या सामन्यात अर्धशतक झळकावणारा वॉर्नर पत्रकार परिषदेत आला आणि टेबलावर असलेल्या Coca Cola च्या बॉटल हटवण्याचा त्यानं प्रयत्न केला. त्यानं दोन बॉटल टेबलाखाली केल्या, परंतु लगेचच आयोजकांकडून एक व्यक्ती आली आणि त्यानं वॉर्नरला त्या बॉटल पुन्हा टेबलावर ठेवण्यास सांगितल्या. त्यानंतर ३५ वर्षीय वॉर्नर म्हणाला, जर हे ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी चांगले असेल, तर ते माझ्यासाठीही असेल.
पाहा व्हिडीओ...