ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: शाहिन शाह आफ्रिदीच्या ( Shaheen Shah Afridi) धक्क्यांनंतर कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kolhi) टीम इंडियाचा डाव सावरला. पाकिस्ताननं पहिल्या पॉवर प्लेमध्ये वर्चस्व गाजवताना भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवलं. पण, विराट व रिषभ पंत ( Rishabh Pan) या जोडीनं पाकिस्तानला बॅकफूटवर फेकले. रिषभ माघारी परतल्यानंतर विराटनं खिंड लढवताना पाकविरुद्ध ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्यामुळे टीम इंडियानं समाधानकारक धावसंख्या उभी केली.
रोहित शर्मा ( Rohit Sharma) व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी डावाची सुरुवात केली. पण, भारताला पहिल्याच षटकात धक्का दिला. शाहिन शाह आफ्रिदी ( Shaheen Afridi ) यानं पहिल्याच षटकात टीम इंडियाला मोठा धक्का दिला. लोकेशनं तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेत रोहितला स्ट्राईक दिली. पण, शाहिनच्या भेदक व आता येणाऱ्या चेंडूनं त्याची विकेट घेतली. रोहितला काही समजण्यापूर्वीच शाहिननं टाकलेला चेंडू रोहितच्या पायावर आदळला अन् LBW ची जोरदार अपील झाली. अम्पायरनंही लगेच हात वर केला व रोहित गोल्डन डकवर बाद झाला. T20 World Cup 2021, T20 World Cup 2021 matches,
लोकेश राहुलही ( ३) त्रिफळाचीत झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर ६ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी सुरुवातीला सावध खेळ करताना डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोन्ही फलंदाज तणावात दिसत होते. त्यातही ते डाव सावरण्यासाठी प्रयत्नशील होते, परंतु सहाव्या षटकात हसन अली गोलंदाजीला आला अन् त्यानं ही जोडी तोडली. चौथ्या चेंडूवर सूर्यकुमार ( ११) बाद झाला. World Cup 2021 live matches, Ind vs Pak live match
रिषभ पंतनं हसन अलीनं टाकलेल्या १२व्या षटकात दोन खणखणीत षटकार खेचून १५ धावा जोडल्या. कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) सह रिषभ चांगला खेळत होता. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूंत ५३ धावा जोडल्या आणि यात रिषभच्या ३९ धावा होत्या. १३व्या षटकात शाबाद खानच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्याच्या प्रयत्नात रिषभनं टोलावलेला चेंडू जागच्या जागी उडाला अन् शाबादनं सुरेख कॅच घेतला. त्यानंतर विराटनं सूत्र हाती घेताना पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेतला. शाबादनं ४ षटकांत २२ धावांत १ विकेट घेतली. भारतानं २० षटकांत ७ बाद १५१ धावा केल्या
पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली ( Hasan Ali) ४ षटकांत ४३ धावा देत दोन विकेट्स घेतल्या. शाहिननं त्याच्या अखेरच्या षटकात टीम इंडियाला आणखी एक धक्का दिला. त्यानं विराटची विकेट घेतली. विराट ४९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ५७ धावांवर झेलबाद झाला. शाहिनच्या त्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कॉमेडी झाली. टीम इंडियाला ओव्हर थ्रो मध्या पाच धावा मिळाल्या अन् बीसीसीआय सचिव जय शाह, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हेही नाचू लागले.