संयुक्त अरब अमिरातीमध्ये दिवाळीत होणाऱ्या आतषबाजीने आशा आहे की, भारतीय क्रिकेट संघाची विजयाची भूक आणखी वाढेल आणि उपांत्य फेरीत पोहोचण्याचे प्रयत्न कायम राहतील. टीम इंडियाने या स्पर्धेत तीन सामने खेळले आहेत. स्पर्धेच्या या प्रारुपात कोणत्याही संघाला पराभूत करणे सोपे नसते. अशात अन्य संघांच्या तुलनेत स्कॉटलंड आणि नामिबिया हे संघ कमी अनुभवी आहेत. त्यांच्यावर दबाव टाकला जाऊ शकतो. संघ निवड खूप कठीण असेल. कारण स्कॉटलंडच्या खेळा़डूंना विश्वस्तरीय फिरकी गोलंदाजी खेळायला मिळत नाही. अशात या संघाच्या विरोधात तीन फिरकीपटूंना खेळवण्याचा विचार वाईट नाही. यात एक लेग स्पिनर असायला हवा.
कारण त्याचा हवेतच वळतो. जेव्हा चेंडू फलंदाजांच्या डोळ्यावरुन येतो. तेव्हा चांगला फलंदाजदेखील लेन्थचा अंदाज घेऊ शकत नाही. असे चेंडू खेळतांना फलंदाजांचे डोके थोडे हलत असते, स्थिर राहू शकत नाही. हेच कारण आहे की, एक चांगला लेग स्पिनर डॉट बॉलसोबतच विकेट घेण्याची क्षमता ठेवतो. भारतीय फलंदाजांनी ज्या पद्धतीने अफगाणी गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. ते पाहणे सुखद होते. जेव्हा संघ १८०पेक्षा जास्त स्कोअर करत होता. तेव्हा गोलंदाजांना खूप मदत मिळते. अशात दवांसोबत अन्य बाबींना फारसे महत्त्व राहात नाही. कारण गोलंदाजांना माहीत असते की, ते चेंडूवर ग्रिप बनवू शकत नाहीत. स्कॉटलंडविरोधात भारतीय फलंदाजांना याच अंदाजात फलंदाजी करावी लागणार आहे.
भलेही भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्यासाठी धडपडत आहे. मात्र, तरीही हे लक्ष्य गाठण्यासाठी भारतीय खेळाडूंनी त्यासाठी पूर्ण प्रयत्न करायला हवेत. हे प्रयत्नच पराभवाच्या निराशेतून बाहेर येण्यासाठीचा एक मार्ग आहे. हा एक खेळ आहे, ज्यात कोणत्याच गोष्टीची निश्चितता नसते. मात्र, असे प्रदर्शन करत जर संघ पराभूत होत असेल, तर ते पाहणे चाहत्यांसाठी निराशाजनक असते. (टीसीएम)
टीम इंडियाला पाहिजे मोठा विजय!
भारतीय संघाचा एक मोठा विजय अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड या संघांवर खूप मोठा दबाव निर्माण करेल. त्यांना रविवारी एकमेकांविरुद्ध भिडायचे आहे. भारतीय फलंदाजांना एक आणखी काम करावे लागेल. त्यांना मोठा विजय मिळवताना नेट रनरेट खूप सुधारावा लागेल. पाकिस्तान व न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवाने भारतीय संघाचा नेट रनरेट खूप कमी झाला आहे. त्यामुळे भारताला मोठ्या विजयाची गरज आहे.
Web Title: T20 World Cup 2021: India will increase pressure on Afghans, New Zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.