Mohammed shami : १४ महिन्यांची मुलगी ICUमध्ये मृत्यूशी झुंज देत होती, तेव्हा मोहम्मद शमी देशासाठी उतरला होता मैदानावर! 

पाकिस्तानविरुद्ध सामना गमावल्यानंतर काही बिनडोक लोकांनी शमीला 'पाकिस्तानात जा' असा सल्ला दिला. शमीच्या बचावासाठी विरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, इरफान पठाण आदी अनेक आजी-माजी क्रिकेटपटू उतरले. पण, तरीही ही ट्रोलिंग थांबली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 11:40 PM2021-10-25T23:40:31+5:302021-10-26T08:51:06+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2021 :  Mohammed shami played test match despite his daughter being in icu in 2016 & today he was abused | Mohammed shami : १४ महिन्यांची मुलगी ICUमध्ये मृत्यूशी झुंज देत होती, तेव्हा मोहम्मद शमी देशासाठी उतरला होता मैदानावर! 

Mohammed shami : १४ महिन्यांची मुलगी ICUमध्ये मृत्यूशी झुंज देत होती, तेव्हा मोहम्मद शमी देशासाठी उतरला होता मैदानावर! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2021, India vs Pakistan, Mohammed Shami Trolled : वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात पाकिस्तान संघानं रविवारी टीम इंडियाला प्रथमच पराभूत करण्याचा पराक्रम केला. भारताचे १५१ धावांचे माफक लक्ष्य पाकिस्ताननं एकही विकेट न गमावता बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांच्या फटकेबाजीच्या जोरावर पार केले. भारतीय गोलंदाजांची कामगिरी या सामन्यात सुमारच झाली, पण टीकाकारांच्या तोफेसमोर मोहम्मद शमी ( Mohammed Shami) याला उभं रहावं लागलं. शमीवर नेटिझन्सनी प्रचंड खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. शमीला ट्रोल करणारे कदाचित हे विसरले की, १४ महिन्यांच्या मुलीला ICU मध्ये सोडून हाच शमी देशासाठी मैदानावर उतरला होता. ( Fans forgot Shami’s performance when her 14-month-old daughter was in ICU. But he was on the field to win the country) 

पाच वर्षांपूर्वीचा हा प्रसंग आहे. ऑक्टोबर २०१६मध्ये कोलकाता येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना खेळवला गेला होता. त्याचवेळी शमीची १४ महिन्यांची मुलगी प्रचंड आजारी पडली आणि तिला श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला ICU मध्ये दाखल करावं लागलं होतं. या परिस्थितीतही शमी संपूर्ण सामना खेळला. एवढंच नव्हे तर त्यानं सामन्यात ६ विकेट्स घेत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. हा सामना जिंकून भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी पोहोचली होती.  


 भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण, सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, फिरकीपटू युजवेंद्र चहल यांनीही ट्रोलर्सला खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. "मीही त्याच भारत-पाकिस्तान सामन्याचा एक भाग आहे की जिथं भारताला पराभवला सामोरं जावं लागलं होतं. हे मी काही वर्षांपूर्वीचं वातावरण सांगू इच्छितो. त्यावेळी मला कुणीच असं पाकिस्तानात निघून जा वगैरे बोललं नव्हतं. सध्या जो मुर्खपणा सुरू आहे तो लगेच थांबवायला हवा", असं इरफान पठाण म्हणाला. 

"मोहम्मद शमीवरील ऑनलाइन हल्ला अतिशय आश्चर्यकारक आहे. मी त्याच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. तो एक चॅम्पियन खेळाडू आहे आणि जो कुणी भारतीय संघाची कॅप परिधान करतो त्याच्या मनात देशाप्रती सर्वोच्च भावना असते. शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत. पुढच्या सामन्यात तुझा जलवा दाखवून दे", असं ट्विट वीरेंद्र सेहवागनं केलं आहे. तर मोहम्मद शमी आम्हाला तुझा अभिमान आहे, असं ट्विट युजवेंद्र चहल यानं केलं आहे. 


 

Web Title: T20 World Cup 2021 :  Mohammed shami played test match despite his daughter being in icu in 2016 & today he was abused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.