Sunil Gavaskar : भारतासाठी खेळणे हा मोठा सन्मान, तू संघात आहेस कारण...; सुनील गावस्कर यांनी जसप्रीत बुमराहला झापलं

T20 World Cup 2021: महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी मंगळवारी भारतीय संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याला झापलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 10:03 PM2021-11-02T22:03:47+5:302021-11-02T22:05:06+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2021: 'Playing for India a huge honor'- Sunil Gavaskar slams Jasprit Bumrah’s comments of players needing a break | Sunil Gavaskar : भारतासाठी खेळणे हा मोठा सन्मान, तू संघात आहेस कारण...; सुनील गावस्कर यांनी जसप्रीत बुमराहला झापलं

Sunil Gavaskar : भारतासाठी खेळणे हा मोठा सन्मान, तू संघात आहेस कारण...; सुनील गावस्कर यांनी जसप्रीत बुमराहला झापलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2021: महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी मंगळवारी भारतीय संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याला झापलं. न्यूझीलंडविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर बुमराह पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे गेला. यावेली त्यानं बायो-बबलचं कारण देत, खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे, असे मत व्यक्त केले. त्यावरून गावस्कर भडकले. भारताला  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दोन पराभव पत्करावे लागले आहेत आणि त्यांचे उपांत्य फेरीत जाण्याचं गणित बिघडलं आहे.  

या सामन्यानंतर जसप्रीत बुमराह पत्रकार परिषदेत आला आणि त्यानं एप्रिलमध्ये आयपीएलपासून ते इंग्लंड दौरा आणि पुन्हा आयपीएल हे व्यग्र वेळापत्रक वाचून दाखवलं. ''काहीवेळेस तुम्हाला विश्रांतीच गरज भासते. कुटुंबाची आठवण येते. सहा महिन्यांपासून क्रिकेट खेळतोय. घरापासून दूर आहोत. त्यामुळे या गोष्टी तुमच्या डोक्यात येतात. बीसीसीआयने याबाबत शक्यतोपरी प्रयत्न केले. मात्र जेव्हा तुम्ही कुटुंबापासून दूर बायो-बबलमध्ये खूप वेळ घालवता तेव्हा अशा गोष्टी डोक्यात नक्कीच येतात. तसेच बायोबबलमध्ये सातत्याने राहिल्यामुळे खेळाडू मानसिक दृष्ट्याही थकतो. 


 
सुनील गावस्करांनी घेतली शाळा..
''तू भारतासाठी खेळत आहेत. त्यामुळे येणाऱ्या आव्हानांसाठी तयार राहायला हवं, हे एवढं सोपं आहे. देशासाठी खेळायला मिळणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. हा खूप मोठा सन्मान आहे, कारण कोट्यवधी मुलं टीम इंडियाची कॅप मिळवण्याची प्रयत्नशील आहेत. त्यामुळे तुला ती मिळालीय याचा तुला अभिमान वाटायला हवं. त्यामुळे कोणतंही कारण असता कामा नये. तू सर्वोत्तम आहेत, म्हणून तुला ही संधी मिळाली आणि तुझ्याकडून तशी कामगिरी अपेक्षित आहे. चाहत्यांची ती इच्छा आहे. सर्व सामने जिंकू शकत नाही, हे आम्हालाही माहित्येय.''

१९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य असलेल्या गावस्करांनी आताचा संघही चॅम्पियन आहे आणि आयसीसी स्पर्धेत का अपयश येतंय, हे ते शोधून काढतील, असे सांगितले. ''खेळात जय-पराजय होतच असतो. चांगला संघही हरतो. हा भारतीय संघ टॉप क्लास आहे, दिग्गज खेळाडू आहेत, परंतु आयसीसीच्या स्पर्धेत त्यांना चांगली कामगिरी करता येत नाही. त्यांनी यावर विचार करायला हवा,''असेही ते म्हणाले. 

Web Title: T20 World Cup 2021: 'Playing for India a huge honor'- Sunil Gavaskar slams Jasprit Bumrah’s comments of players needing a break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.