changes in Pakistan’s 15 members squad for T20 World Cup : टीम इंडियाला यंदा वर्ल्ड कप स्पर्धेत पराभूत करू असा दावा करणारा पाकिस्तान संघ मुख्य स्पर्धेआधीच घाबरला. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( PCB) जेव्हा आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली, तेव्हापासूनच काही खेळाडूंना डावलल्यामुळे वाद सुरू होता. त्यात संघ जाहीर होताच मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक व गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनिस यांनी राजीनामा दिला. त्यात कर्णधार बाबर आजमही या संघावर नाराज असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. अखेर PCBनं संघात तीन बदल केले. सर्वात अनुभवी फलंदाज शोएब मलिक याला संधी मिळेल असे वाटले होते, परंतु तसे झाले नाही,
आसीफ अली आणि खुशदील शाह हे दोन चेहरे वर्ल्ड कप संघात दिसल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. अनुभवी यष्टिरक्षक सर्फराज अहमद याच्याऐवजी संघानं आझम खान याला पसंती दिली होती. फाखर झमान, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादीर यांना संघात स्थान पटकावता आलेले नाही, परंतु त्यांची राखीव खेळाडू म्हणून निवड केली गेली आहे. आज PCBनं जाहीर केलेल्या संघातून आझम खान, मोहम्मद सनैन व खुशदाल शाह यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी सर्फराज अहमद, हैदर अली व फाखर झमान यांना संधी मिळाली आहे. ( Three changes in the national squad for the T20 World Cup, Sarfraz Ahmed and Haider Ali replacing Azam Khan and Mohammad Hasnain as part of the 15-member national squad, Fakhr Zaman replacing Khushdal Shah.)
वर्ल्ड कप स्पर्धेत साकलेन मुश्ताक याची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. ( Shaqleen Mushtaq to be head coach of Pakistan cricket team in World Cup) खुशदील शाह, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादीर यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. सोहैब मक्सूद याची निवड ही वैद्यकिय सल्ल्यानंतर होईल.
पाकिस्तानचा वर्ल्ड कप संघ - बाबर आझम, आसीफ अली, मोहम्मद हाफिज, सोहैब मक्सूद, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, शाहिन शाह आफ्रिदी, सर्फराज अहमद, हैदर अली व फाखर झमान
Web Title: T20 World Cup 2021 : Sarfaraz Ahmed, Haider Ali, Fakhar Zaman included in Pakistan’s 15 members squad for T20 World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.