Join us

T20 World Cup 2021, Semi Finals: उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट, कशी होणार लढत? जाणून घ्या सविस्तर...

T20 World Cup 2021, Semi Finals Teams: यूएईमध्ये सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 23:42 IST

Open in App

T20 World Cup 2021, Semi Finals Teams: यूएईमध्ये सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. उपांत्य फेरीत पोहोचलेले चार संघ आता मिळाले आहेत आणि सामन्यांचं वेळापत्रकही समोर आलं आहे. पाकिस्ताननं आज स्कॉटलंडचा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. खरंतर पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीसाठी याआधीच पात्र ठरला होता. पण आजच्या सामन्यानंतर गुणतालिकेतील स्थान निश्चित होऊन उपांत्य फेरीत नेमकी कोणत्या संघाची कुणासोबत लढत होणार हे निश्चित झालं आहे. 

आयसीसी ट्वेन्टी-२० वर्ल्डकप २०२१ (ICC T20 World Cup 2021) पहिली उपांत्य फेरी बुधवारी १० नोव्हेंबर रोजी अबूधाबीच्या स्टेडियममध्ये रंगणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात लढत होईल. तर उपांत्य फेरीचा दुसरा सामना गुरुवारी ११ नोव्हेंबर रोजी दुबईच्या स्टेडियमवर होणार असून पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. 

ICC T20 World Cup 2021, Semi Finals:

  • १० नोव्हेंबर: इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, अबूधाबी (संध्याकाळी ७.३० वाजता)
  • ११ नोव्हेंबर: पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुबई (संध्याकाळी ७.३० वाजता)

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१पाकिस्तानआॅस्ट्रेलियाइंग्लंडन्यूझीलंड
Open in App