भारतीय संघाचे ( Indian Cricket Team) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान ( T20 World Cup) साखळी फेरीतच संपुष्टात आले आणि खेळाडू मायदेशातही परतले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते, परंतु त्यांना उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचता आले नाही. भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्ताननं प्रथमच भारतावर विजय मिळवला. या सामन्यात २१ वर्षीय गोलंदाज शाहिन आफ्रिदीनं ( Shaheen Afridi) दिलेल्या धक्क्यातून सावरणे टीम इंडियाला जमले नाही. त्या दिवशी भारतीय फलंदाजांना माघारी पाठवल्यानंतर शाहिन आता त्यांची खिल्ली उडवत हे.
२४ ऑक्टोबर २०२१ ला झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं बाजी मारली. १९९२ ते २०१९पर्यंत झालेल्या वन डे व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानं १२ सामन्यांत पाकिस्तानला पराभूत केले होते. पण, यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्ताननं १० विकेट्स राखून सहज विजय मिळवला. शाहिन आफ्रिदीनं पाकिस्तानच्या विजयाचा पाया रचला. त्यानं पहिल्या षटकात रोहित शर्माला LBW केले आणि तिसऱ्या षटकात लोकेश राहुलचा त्रिफळा उडवला. १८व्या षटकात त्यानं विराट कोहलीला बाद केले.
आता शाहिन त्याच्या या कामगिरीनंतर भारतीय फलंदाजांची खिल्ली उडवताना दिसत आहे. रोहित, लोकेश व विराट कसे बाद झाले याची नकल करून तो चाहत्यांना दाखवत आहे.
पाहा व्हिडीओ..