Join us  

T20 World Cup 2021 : पाकिस्तान खेळतोय संगीत खुर्ची; दोन दिवसांत संघात चार बदल, नव्यानं दाखल झालेल्या खेळाडूचं भारताशी नातं

one more change in Pakistan WC Team : पाकिस्तानचा संघ १५ ऑक्टोबरला दुबईत दाखल होणार आहे आणि त्यानंतर वेस्ट इंडिज ( १८ ऑक्टोबर ) व दक्षिण आफ्रिका ( २० ऑक्टोबर) यांच्याविरुद्ध सराव सामना खेळेल. २४ ऑक्टोबरला भारताविरुद्ध त्यांचा सामना आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 4:42 PM

Open in App

Pakistan's Sohaib Maqsood has been ruled out : पाकिस्तान क्रिकेट संघानं त्यांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात दोन दिवसांत चार बदल केले. सुरूवातीला त्यांनी जो संघ जाहीर केला, त्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) नं  शुक्रवारी संघात तीन बदल केले आणि आज त्यांनी पाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या खेळाडूला संधी दिली. पाकिस्तानचा खेळाडू सोहैब मक्सूद यानं दुखापतीमुळे माघार घेतली. नॅशनल ट्वेंटी-२० कप स्पर्धेत त्याला दुखापत झाली होती. त्याच्या जागी आता शोएब मलिक ( Shoaib Malik) याची निवड करण्यात आली आहे. PCBनंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Shoaib Malik will replace Sohaib Maqsood - ६ ऑक्टोबरला मक्सूदच्या पाठीला दुखापत झाली होती. ''सोहैब आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळू शकणार नाही. दुखापतीतून सावरण्यासाठी त्यानं भरपूर प्रयत्न केले, परंतु दुर्दैवानं तो अपयशी ठरला,''असे PCBचे निवड समिती प्रमुख मुहम्मद वासीम यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ''संघ व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर आम्ही त्याच्याजागी शोएब मलिकची निवड करण्याचा निर्णय घेतला. शोएबचा अनुभव संपूर्ण संघाच्या कामी येईल.'' शुक्रवारी PCBनं आझम खान, मोहम्मद सनैन व खुशदाल शाह यांना वगळून त्यांच्या जागी सर्फराज अहमद, हैदर अली व फाखर झमान यांना संधी दिली. 

२००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात मलिक हा पाकिस्तानचा कर्णधार होता आणि २००९च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचाही तो सदस्य होता. त्याशिवाय त्यानं २०१२, २०१४ व २०१६च्या स्पर्धेतही संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र, वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी निवड समितीनं युवा खेळाडूंवर भरवसा दाखवत त्याला संघाबाहेर ठेवले. मलिकनं मागील वर्षभरात जगभरातील ट्वेंटी-२० लीगमध्ये प्रतिनिधित्व करताना ४९ सामन्यांत ३०.८५च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. पाकिस्तानकडून सर्वाधिक आयसीसी स्पर्धा खेळण्याचा विक्रम मलिकनं केला आहे. त्यानं दोन वन डे वर्ल्ड कप ( २०११ व २०१५), सहा चॅम्पियन्स ट्रॉफी व सहा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.

पाकिस्तानचा वर्ल्ड कप संघ - बाबर आझम, आसीफ अली, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, शाहिन शाह आफ्रिदी, सर्फराज अहमद, हैदर अली व फाखर झमान 

संबंधित बातम्या

T20I World Cup 2021 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या नियमांत बदल; उपांत्य व अंतिम फेरीच्या सामन्यांमध्ये आणला ट्विस्ट

T20 World Cup prize money : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेता संघ होणार मालामाल, मिळणार कोट्यवधींचं ईनाम 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१पाकिस्तानशोएब मलिक
Open in App