Join us  

T20 World Cup 2021 warm-up schedule: आयपीएलनंतर भारतीय खेळाडूंना विश्रांतीसाठीही वेळ नाही; जाणून घ्या सराव सामन्याचं वेळापत्रक

T20 World Cup 2021 warm-up schedule: इंडियन प्रीमिअर लीग २०२१ची फायनल १५  ऑक्टोबरला होईल आणि त्यानंतर १७ ऑक्टोबरला लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 4:15 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२१ची फायनल १५  ऑक्टोबरला होईल आणि त्यानंतर १७ ऑक्टोबरला लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध आहे. त्यामुळे आयपीएलनंतर टीम इंडियाच्या शिलेदारांना विश्रांतीसाठी वेळ मिळेल, असे वाटले होते. पण, पाकिस्तानचा सामना करण्यापूर्वी भारतीय संघ दोन तगड्या प्रतिस्पर्धींविरुद्ध सराव सामने खेळणार आहेत. त्यामुळे व्यग्र वेळापत्रकामुळे त्यांची दमछाक होईल हे निश्चित आहे. 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिले क्वालिफायर सामने होतील आणि त्यानंतर सुपर १२ संघांमध्ये जेतेपदासाठीची चुरस रंगेल. यूएई व ओमान येथे होणाऱ्या या स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून काही सराव सामन्यांचे आयोजन केले गेले आहे आणि हे सराव सामने १८ व २० ऑक्टोबरला खेळवले जातील. या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरलेल्या ८ संघांमध्ये हे सराव सामने होतील आणि त्यांना प्रत्येकाला दोन सामने खेळावे लागणार आहेत.  

भारतीय संघ इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांचा सामना करेल. विराट कोहली अँड टीम १८ ऑक्टोबरला इयॉन मॉर्गन अँड कंपनीचा, तर २० ऑक्टोबरला आरोन फिंच अँड कंपनीचा सामना करेल.  

ट्वेटी-२० वर्ल्ड कप २०२१च्या सराव सामन्यांचे वेळापत्रक( T20 World Cup 2021 warm-up schedule)

  1. १८ ऑक्टोबर ( भारतीय प्रमाणवेळ) 
  • अफगाणिस्तान वि. दक्षिण आफ्रिका ( दुपारी ३.३० वाजल्यापासून)
  • पाकिस्तान वि. वेस्ट इंडिज  ( दुपारी ३.३० वाजल्यापासून)
  • ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड ( सायं. ७.३० वाजल्यापासून) 
  • भारत वि. इंग्लंड ( सायं. ७.३० वाजल्यापासून)
  1. २० ऑक्टोबर 
  • इंग्लंड वि. न्यूझीलंड ( दुपारी ३.३० वाजल्यापासून)
  • भारत वि. ऑस्ट्रेलिया ( दुपारी ३.३० वाजल्यापासून) 
  • दक्षिण आफ्रिका वि. पाकिस्तान  ( सायं. ७.३० वाजल्यापासून) 
  • अफगाणिस्तान वि. वेस्ट इंडिज ( सायं. ७.३० वाजल्यापासून)  

 

भारतीय संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर व दीपक चहर ( TEAM - Virat Kohli (Capt), Rohit Sharma (vc), KL Rahul, Suryakumar Yadav, Rishabh Pant (wk), Ishan Kishan (wk), Hardik Pandya, Ravindra Jadeja, Rahul Chahar, Ravichandran Ashwin, Axar Patel, Varun Chakravarthy, Jasprit Bumrah, Bhuvneshwar Kumar, Mohd Shami.) 

भारतीय संघाचे वेळापत्रक२४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता३१ ऑक्टोबर -   भारत वि. न्यूझीलंड, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता३ नोव्हेंबर -    भारत वि, अफगाणिस्तान, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता५ नोव्हेंबर - भारत वि. ब गटाती अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता८ नोव्हेंबर - भारत वि. अ गटातील उपविजेता, दुबई, सायंकाळी ७.३० वाजताउपांत्य फेरीचे सामने  -१० नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर अंतिम सामना - १४ नोव्हेंबर    

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध पाकिस्तानइंग्लंडआॅस्ट्रेलिया
Open in App