मेलबर्न : अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात होणारा सामना पावसाच्या विलंबामुळे रद्द करण्यात आला आहे. खरं तर याच मेलबर्नच्या मैदानावर आज यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. सुपर-12 तील आजचा सामना एकही चेंडू न खेळता रद्द झाला. खरं तर अफगाणिस्तानच्या संघाने एकही विजय न मिळवता 2 गुण मिळवले आहेत. अफगाणिस्तानला आपल्या सलामीच्या सामन्यात इंग्लिश संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर त्यांचा दुसरा सामना न्यूझीलंडविरूद्ध होणार होता मात्र तोही रद्द झाला. त्यामुळे अफगाणिस्तानला एक गुण मिळाला. अशातच आजचाही सामना रद्द झाल्यामुळे त्यांना आणखी एक गुण मिळाला आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानविरूद्धचा सामना रद्द झाल्यामुळे आयर्लंडला 3 गुणांवर समाधान मानावे लागले आहे. आयर्लंडने इंग्लंडचा पराभव करून क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे. आज या स्पर्धेत भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजल्यापासून यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. दोन्हीही संघानी 1-1 विजय मिळवून इथपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला तर कांगारूच्या संघाने दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेला धूळ चारून विजय मिळवला. इंग्लंडने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव करून विजयी सलामी दिली मात्र आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात पावसामुळे पराभव स्वीकारावा लागला. ग्रुप ए मध्ये 3 गुणांसह न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानी विराजमान आहे. तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया 2-2 गुणांसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर स्थित आहे.
सुपर-12 मध्ये होणारे आगामी सामने
- 28 ऑक्टोबर इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न - दुपारी 1.30 वाजल्यापासून
- 29 ऑक्टोबर न्यूझीलंड विरूद्ध श्रीलंका, सिडनी - दुपारी 1.30 वाजल्यापासून
- 30 ऑक्टोबर बांगलादेश विरूद्ध झिम्बाब्वे, ब्रिस्बेन - सकाळी 8.30 वाजल्यापासून
- 30 ऑक्टोबर पाकिस्तान विरूद्ध नेदरलॅंड्स, पर्थ - दुपारी 12.30 वाजल्यापासून
- 30 ऑक्टोबर भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका विरूद्ध आयर्लंड, ब्रिस्बेन - दुपारी 1.30 वाजल्यापासून
- 31 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयर्लंड, ब्रिस्बेन - दुपारी 1.30 वाजल्यापासून
- 1 नोव्हेंबर अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका, ब्रिस्बेन - सकाळी 9.30 वाजल्यापासून
- 2 नोव्हेंबर झिम्बाब्वे विरुद्ध नेदरलँड्स, ॲडलेड - सकाळी 9.30 वाजल्यापासून
- 3 नोव्हेंबर पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सिडनी - दुपारी 1.30 वाजल्यापासून
- 4 नोव्हेंबर न्यूझीलंड विरुद्ध न्यूझीलंड, ॲडलेड - सकाळी 9.30 वाजल्यापासून
- 4 नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान, ॲडलेड - दुपारी 1.30 वाजल्यापासून
- 5 नोव्हेंबर इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, सिडनी - दुपारी 1.30 वाजल्यापासून
- 6 नोव्हेंबर दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स, ॲडलेड - सकाळी 5.30 वाजल्यापासून
- 6 नोव्हेंबर पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, ॲडलेड - सकाळी 9.30 वाजल्यापासून
- 6 नोव्हेंबर भारत विरुद्ध झिम्बाब्वे, मेलबर्न - दुपारी 1.30 वाजल्यापासून
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"