Join us  

T20 World Cup 2022: पाकिस्तानच्या विजयानंतर इरफान पठाण आणि पाकिस्तानच्या माजी खेळाडूमध्ये रंगलं 'शाब्दिक युद्ध'

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 3:48 PM

Open in App

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या संघाने पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आपल्या संघाच्या या विजयाने पाकिस्तानचे चाहते खूप खुश आहेत. आपला संघ अंतिम फेरीत पोहोचल्यावर माजी क्रिकेटपटूंपासून प्रत्येकजण खूप आनंदी आहे. अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने एक ट्विट केले जे पाकिस्तानचा माजी खेळाडू इम्रान नाझीरला खटकले आहे. एकिकडे पाकिस्तानने फायनलमध्ये धडक मारली अन् पठाण आणि नाझीर यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. 

इरफान पठाण आणि इम्रान नझीर यांच्यात 'शाब्दिक युद्ध' खरं तर इरफान पठाणनने पाकिस्तानच्या विजयानंतर एक ट्विट करून शेजाऱ्यांच्या चाहत्यांना डिवचले होते. माजी गोलंदाजाने ट्विट करत लिहले, "शेजाऱ्यांचा विजय तर होत राहतो पण ही तुमची गोष्ट नाही आहे." 

यानंतर इरफान पठाणने आणखी एक ट्विट केले आणि लिहिले की, हे खेळाडूंसाठी अजिबात नाही. अर्थात त्याचे हे हावभाव शेजारी देशातील चाहत्यांसाठी असल्याचे त्याने स्पष्ट केले. मात्र पाकिस्तानी संघाचा माजी सलामीवीर इम्रान नाझीरला पठाणचे ट्विट आवडले नाही आणि प्रत्युत्तर देताना म्हटले, "अशा पद्धतीचे ट्विट पाहून दु:ख होत आहे." 

नाझीरने केलेल्या ट्विटला इरफान पठाणने देखील उत्तर दिले. यावर इरफान पठाणने इम्रान नजीरला जबरदस्त उत्तर दिले. दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने लिहले, "विजयानंतर मैदानात काही पाकिस्तानी चाहत्यांची वृत्ती पाहून तुलाही खूप वाईट वाटले असेल." 

इरफान पठाण सध्या ऑस्ट्रेलियात कॉमेंट्रीसाठी उपस्थित आहे आणि तो मैदानावर जाऊन सामन्याच्या आधी पोस्ट शो देखील करतो. पाकिस्तानी संघाबद्दल भाष्य करायचे झाले तर, शेजाऱ्यांनी सलामीचे दोन सामने गमावल्यानंतर शानदार पुनरागमन केले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी संघ स्पर्धेतून बाहेर होणार असल्याची चर्चा होती. मात्र सलग सामने जिंकून आता पाकिस्तानी संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यांचा अंतिम सामना भारत आणि इंग्लंड यांच्यातील विजेत्या संघासोबत होणार आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानइरफान पठाणभारतीय क्रिकेट संघ
Open in App