T20 World Cup 2022: टी-२० वर्ल्डकपच्या सुपर-१२ मधील सर्व संघ झाले निश्चित, भारताच्या गटात या दोन संघांची एंट्री 

T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपमधील सुपर १२ फेरीत पोहोचलेल्या सर्व संघांची नावे निश्चित झाली आहेत. या फेरीत पोहोचणारा झिम्बाब्वे हा शेवटचा संघ ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 06:12 PM2022-10-21T18:12:10+5:302022-10-21T18:13:30+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2022: All Super-12 teams of T20 World Cup confirmed, these two teams enter India's group | T20 World Cup 2022: टी-२० वर्ल्डकपच्या सुपर-१२ मधील सर्व संघ झाले निश्चित, भारताच्या गटात या दोन संघांची एंट्री 

T20 World Cup 2022: टी-२० वर्ल्डकपच्या सुपर-१२ मधील सर्व संघ झाले निश्चित, भारताच्या गटात या दोन संघांची एंट्री 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबर्न - ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपमधील सुपर १२ फेरीत पोहोचलेल्या सर्व संघांची नावे निश्चित झाली आहेत. या फेरीत पोहोचणारा झिम्बाब्वे हा शेवटचा संघ ठरला आहे. क्रेग इर्विनच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वेच्या संघाने होबार्टमध्ये झालेल्या सामन्यात स्कॉटलंडला पाच विकेट्सनी पराभूत करून हे यश मिळवले आहे. झिम्बाब्वेच्या आधी श्रीलंका, नेदरलँड्स आणि आयर्लंडच्या संघानी क्वालिफाईंग फेरीत बाजी मारत सुपर १२ फेरीत प्रवेश केला होता. या चार संघांपैकी झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सचे संघ हे भारताचा समावेश असलेल्या गटात पोहोचले आहेत. तर श्रीलंका आणि स्कॉटलंडचे संघ ग्रुप-मध्ये दाखल झाले आहेत. 

झिम्बाब्वेने क्वालिफाईंग राऊंड-१ च्या ग्रुप बीमधील पहिलं स्थान मिळवलं. झिब्वाब्वेच्या संघाला सुपर १२ फेरीतील ग्रुप २ मध्ये प्रवेश मिळाला. या गटात भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशचा समावेश आहे. भारत आणि झिम्बाब्वेचा सामना ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील लढल ही २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

ग्रुप १ - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, ग्रुप ए विजेता (श्रीलंका), ग्रुप बी उपविजेता (स्कॉटलंड) 
ग्रुप २ - भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, ग्रप ए उपविजेता (नेदरलँड्स), ग्रुप बी विजेता (झिम्बाब्वे) 

Web Title: T20 World Cup 2022: All Super-12 teams of T20 World Cup confirmed, these two teams enter India's group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.