Pakistan qualifies for T20 World Cup semi-final - ६ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत पाकिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल, अशी पुसटची आशाही कुणाला नव्हती. पण, चमत्कार घडला अन् नेदरलँड्सने उपांत्य फेरीच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा धक्कादायक पराभव केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील हा सर्वात धक्कादायक निकाल म्हणावं लागेल. आफ्रिका उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाद झाल्यानंतर पाकिस्तानला लॉटरी लागली. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश या लढतीला अचानक महत्त्व प्राप्त झाले आणि बाबर आजम अँड कंपनीने विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाकिस्तानच्या नाट्यमय एन्ट्रीनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण ( Irfan Pathan) याने ट्विट करून शेजाऱ्यांची फिरकी घेतली. पण, त्याचे हे ट्विट झोंबले अन् पाकिस्तानी फॅन्सकडून इराफन ट्रोल झाला.
पाकिस्तानची कामगिरी
- ४ विकेट्सने पराभूत विरुद्ध भारत
- १ धावेने पराभूत विरुद्ध झिम्बाब्वे
- ६ विकेट्स राखून वि. विरुद्ध नेदरलँड्स
- ३३ धावांनी ( DLS) वि. विरुद्ध दक्षिण आफ्रिका
- ५ विकेट्स राखून वि. विरुद्ध बांगलादेश
शेजाऱ्यांचे ट्विटर अकाऊंट केवळ रविवारच्या नावाने जिंवत आहेत, अशी इरफानने फिरकी घेतली.