नवी दिल्ली-
ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेनं पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पण तुम्हाला माहित्येय का झिम्बाब्वेच्या या यशाच्या कहाणीमागेही एका भारतीयाचे खडतर परिश्रम आहेत. तो व्यक्ती दुसरं तिसरं कुणी नसून भारताचे माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत हे आहेत. त्यांनी अवघ्या चार वर्षातच झिम्बाब्वे क्रिकेटच्या चेहरामोहराच बदलून टाकला. माजी सलामीवीर फलंदाज लालचंद राजपूत यांना जुलै २०१८ साली झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा हेड कोच म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं आणि ते जून २०२२ पर्यंत या पदावर काम करत होते. सध्या राजपूत हे झिम्बाब्वेच्या संघाचे टेक्निकल डायरेक्टर आहेत.
लालचंद राजपूत यांनी त्यांच्या झिम्बाब्वेच्या कोचिंगचा एक किस्सा यावेळी सांगितला. "सामन्याच्या एक दिवस आधी आम्हाला झिम्बाब्वे क्रिकेटनं कळवलं की क्रेग इर्व्हिन, सीन विलियम्स, सिकंदर रजा आणि ब्रँडन टेलर यांच्यासोबत पगाराच्या वादावरुन त्यांना संघातून बाहेर करण्यात आलं आहे. झिम्बाब्वे क्रिकेटच्या व्यवस्थापक संचालक गिवमोर मकोनी यांनी मला पाकिस्तान विरुद्धची सीरिज रद्द करता येणार नाही असं सांगितलं. आम्हाला कोणताही अनुभव नसलेली टीम मिळाली आणि आम्ही पहिल्या सामन्यात १०० तर तिसऱ्या सामन्यात ५० धावांच्या जवळपास ऑल ऑउट झालो होतो", असं लालचंद राजपूत म्हणाले.
... तर झिम्बाब्वे सेमी फायनलला जाणार, भारत किंवा द. आफ्रिका यांच्यापैकी एकाला संधी मिळणार
"पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर मला चांगलं कळालं की परिस्थिती बदलण्यासाठी मला थोडं थांबावं लागणार आहे. २०१९ सालच्या वर्ल्डकपसाठी क्वालीफाय होण्यात आम्हाला अपयश आलं. तो काळ अत्यंत कठीण होता. त्यामुळे अवघ्या चार वर्षांच्या काळात आम्ही घडवलेल्या परिवर्तानाचा आम्हाला अभिमान आहे. माझं स्वप्न ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० स्पर्धेसाठी क्वालीफाय होणं हे आधीपासूनच होतं. ते आम्ही पूर्ण केलं. पण यात पाकिस्तानचा पराभव करणं म्हणजे सोन्याहून पिवळं घडलं आहे. मला संघातील प्रत्येक खेळाडूचा अभिमान आहे", असंही लालचंद राजपूत म्हणाले.
लालचंद राजपूत यांच्याच कोचिंगनं भारत बनला होता चॅम्पियनभारतीय संघानं ज्यावेळी २००७ साली ट्वेन्टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी लालसिंग राजपूत हे भारतीय संघाचा प्रशिक्षक होते. राजपूत क्वालीफायरपर्यंत संघासोबत होते. पण दिवाळीसाठी त्यांनी आपल्या कुटुंबासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यामुळे ते दिल्लीला परतले होते. नील जॉन्सन, अँडी फ्लावर आणि ग्रांट फ्लावर, पॉल स्ट्रैंग आणि हीथ स्ट्रीक सारखे खेळाडू संघाबाहेर गेल्यानंतर झिम्बाब्वे क्रिकेट रसातळाला गेलं होतं.
सिकंदर रजाचं केलं तोंडभरुन कौतुकलालचंद राजपूत यांनी सिकंदर रजा याचं कौतुक केलं. "सिकंदर एक भावूक खेळाडू आहे. वयाच्या ३६ व्या वर्षीही तो स्वत:मध्ये बदल करण्याचे आणि शिकण्याच्या वृत्तीनं खेळताना दिसतो. मी जेव्हा प्रशिक्षकपद स्वीकारलं तेव्हा त्याला विचारलं होतं की तू आजवर संघासाठी किती सामने जिंकून दिले आहेस. त्यावेळी त्यानं बराच काळ शतकी खेळी देखील साकारली नव्हती. तो सातत्यानं सरासरी ४० धावा करत होता. त्यामुळे संघातील त्याची जागा सुरक्षित राहिली होती. पण शतकी खेळी करता आली नव्हती", असं लालचंद राजपूत म्हणाले.