T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात T-20 विश्वचषक सुरू आहे. भारताने पहिले दोन सामने जिंकून चांगली सुरुवात केली, पण रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना 5 विकेटने हरला. या पराभवानंतर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पर्थच्या खेळपट्टीवर टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करताना केवळ 133 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने हे सोपे लक्ष्य पाच विकेट्स राखून पूर्ण केले.
पराभवामुळे हरभजन सिंग संतापला
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाच्या दारूण पराभवानंतर माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने संताप व्यक्त केला आहे. हरभजन सिंगने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून दोन खेळाडूंना तात्काळ बाहेरचा रस्ता दाखवण्याची मागणी केली. हरभजन सिंगच्या मते, सलामीवीर केएल राहुल आणि ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यांना टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवायला हवा.
सलामीला ऋषभ पंत
'स्पोर्ट्स तक'शी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, 'भारतीय संघ व्यवस्थापनाला ठोस निर्णय घ्यावे लागतील आणि खेळाडूंपेक्षा संघाचा विचार करावा लागेल. केएल राहुल हा चांगला फलंदाज असला तरी तो सध्या फॉर्ममध्ये नाही. अशा परिस्थितीत केएल राहुलऐवजी ऋषभ पंतला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यायला हवी.'
चहलला संधी मिळावी
हरभजन पुढे म्हणाला, 'ऋषभ पंतने रोहित शर्मासोबत सलामीला उतरावे. रविचंद्रन अश्विनही टीम इंडियासाठी कमकुवत दुवा ठरत आहे. अश्विनऐवजी लेगस्पिनर युजवेंद्र चहलला संधी दिली पाहिजे. युझवेंद्र चहल हा विकेट घेणारा गोलंदाज आहे. टी-20 मध्ये युझवेंद्र चहलपेक्षा चांगला लेग-स्पिनर दुसरा नाही,' असेही भज्जी म्हणाला.
Web Title: T20 world cup 2022 | harbhajan singh on team india playing 11 selection
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.