सध्या टी 20 वर्ल्डकप रंगतदार वळणारवर आला आहे. मंगळवारी झालेल्या दोन सामन्यांपैकी पहिल्या सामन्यात श्रीलंकेनं अफगाणिस्तानचा सहा विकेट्सनं पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडनं न्यूझीलंडचा 20 धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या विजयानंतर पहिल्या गटातील सेमीफायनलचं गणित फसलं असून ते नेट रनरेटवरूनही ठरण्याची शक्यता आहे.
पहिव्या गटात न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही संघांचे पाच पाच गुण आहेत. ४ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. तर न्यूझीलंडचा संघ आयर्लंडशी भिडणार आहे. आपल्या अखेरच्या सामन्यात इंग्लंडचा संघ ५ नोव्हेंबरला श्रीलंकेशी भिडेल. अपेक्षेप्रमाणे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा संघ आपले अखेरचे सामने जिंकला, तर तिन्ही संघांचे सात सात गुण होतील. अशा नेट रनरेटनुसार पहिल्या दोन संघांना संधी मिळेल.
असा काढला जातो नेट रनरेट
नेट रन रेट काढण्यासाठी फलंदाजीच्या रनरेटला गोलंदाजीच्या रनरेटमधून वजा केला जातो. उदा. श्रीलंकेच्या टीमनं 20 ओव्हर्समध्ये 200 धावा केल्या असतील आणि नतंर गोलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 140 धावाच करू दिल्या तर त्यांचा नेट रनरेट 3 असेल. संघाने 20 ओव्हर्समध्ये 200 धावा केल्या त्यामुळे बॅटिंग रनरेट 10 असेल. तर 140 धावा दिल्यामुळे त्यांचा बॉलिंग रनरेट 7 असेल. म्हणजेच 10 मधून 7 वजा केल्यावर त्यांचा रनरेट निघेल.
जर एखादा संघ पहिल्या तीनच ओव्हर्समध्ये ऑल आऊट झाला तरी त्यांचा नेट रन रेट त्यांच्या निर्धारित ओव्हर्सच्या आधारावरच असे. समजा अफगाणिस्तानचा संघ 18 ओव्हर्समध्ये 5 च्या रनरेटनं 90 धावाच करू शकला, तर त्यांचा बॅटिंग रन रेट 90/20=4.50 होईल.
DLS असल्यास कसा असेल रनरेट
जर सामन्यात पाऊस किंवा अन्य कोणत्या कारणाने व्यत्यय आल्यास नेट रनरेट ऐवजी डीएलएसनुसार निर्णय घेतला जातो. उदा. जर ऑस्ट्रेलियाच्या संघाने 20 ओव्हर्समध्ये 200 धावा केल्या आणि पावसामुळे अफगाणिस्तानसाठी टार्गेट 16 ओव्हर्समध्ये 170 केलं गेलं तर नेट रन रेट 16 ओव्हर्समध्ये करण्यात आलेल्या धावांच्या आधारेच होतं. जर पहिला संघ पूर्ण ओव्हर्स खेळला आणि दुसऱ्यांदा बॅटिंग करणारी टीम कमी धावांमध्ये ऑल आऊट झाली तर त्याला नेट रनरेटमध्ये पूर्ण ओव्हर्स खेळण्याचा फायदा मिळतो. मालिकेत नेट रनरेट मॅचसोबत वाढतो किंवा कमी होतो.
Web Title: T20 World Cup 2022 How is the net run rate calculated which spoils the whole equation ind bangladesh australia england
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.