टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत गुरुवारी इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून पराभव केला. या लाजीरवाण्या पराभवाने पुन्हा एकदा भारताचे विजेतेपदाचे स्वप्न धुळिला मिळाले. मात्र, या स्पर्धेतून बाहेर पडूनही भारतीय संघावर कोट्यवधी रुपयांची बरसात होणार आहे. T20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच आयसीसीने स्पर्धेच्या बक्षिसांसंदर्भात घोषणा केली होती. या स्पर्धेत एकूण 5.6 मिलियन डॉलर बक्षीस रक्कम म्हणून वाटण्यात येणार आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे 45.67 कोटी रुपये एवढी आहे. तर जाणून घेऊयात यांपैकी भारताला किती कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार या यासंदर्भात...
भारत आणि न्यूझीलंडला मिळणार कोट्यवधींचे बक्षीस -
भारताशिवाय, केन विल्यम्सच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघदेखील टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतूनच बाहेर पडला आहे. पाकिस्तानने त्यांचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक संघाला 0.4 मिलियन डॉलर (अंदाजे रु. 3.26 कोटी रुपेय) एवढी बक्षीस रक्कम दिली जाणार आहे. तर विजेत्या संघावर आणि उपविजेत्या संघावर याहूनही अधिक पैशांचा पाऊस पडणार आहे.
टी-20 वर्ल्ड कप जिकणाऱ्या संघाला किती बक्षीस मिळणार? -
यावेळी पाकिस्तान आणि इंग्लंडने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हे दोन्ही संघ 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर विजेतेपदासाठी लढतील. स्पर्धेतील विजेत्या संघाला 1.6 मिलियन डॉलर (अंदाजे 13 कोटी रुपये) एवढे बक्षीस मिळेल, तर अंतिम फेरीत पराभूत होणारा संघ तब्बल 0.8 मिलिय डॉलर (अंदाजे रु. 6.5 कोटी रुपये) आपल्यासोबत घेऊन जाईल.
टी20 वर्ल्ड कप 2022 ची प्राइस मनी लिस्ट -
विजेता संघ - 1.6 मिलियन डॉलर (अंदाजे 13 कोटी रुपये)
उप-विजेता संघ - 0.8 मिलियन डॉलर (अंदाजे 6.5 कोटी रुपये)
उपांत्य फेरीत पराभूत होणारा संघ - 0.4 मिलियन डॉलर (अंदाजे 3.26 कोटी रुपये)
सुपर 12 मध्ये प्रत्येक सामना जिंकणारा संघ - 40 हजार डॉलर (अंदाजे 33.62 लाख रुपये)
सुपर 12 मधून बाहेर होणारा संघ - 70 हजार डॉलर (अंदाजे 57,09 लाख रुपये)
पहिल्या फेरीत प्रत्येक सामना जिंकणारा संघ - 40 हजार डॉलर (अंदाजे 33.62 लाख रुपये)
पहिल्या फेरीतून बाहेर पडणारा संघ - 40 हजार डॉलर (अंदाजे 33.62 लाख रुपये)
Web Title: T20 world cup 2022 icc prize money see full list here in indian rupee how much money will india get
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.