Join us  

T20 World Cup 2022 : IND vs PAK सामन्यासाठी रोहित शर्माची प्लेइंग इलेव्हन ठरली, मोहम्मद शमीला स्थान मिळणार की नाही?

T20  World Cup 2022, India vs Pakistan : रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह व दीपक चहर यांच्या दुखापतीचे धक्के पचवून भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 11:45 AM

Open in App

T20  World Cup 2022, India vs Pakistan : रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह व दीपक चहर यांच्या दुखापतीचे धक्के पचवून भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी शनिवारी १६ संघांच्या कर्णधारांचे संयुक्त फोटोशूट व पत्रकार परिषद झाली. यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma)च्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास दिसत होता. २००७ नंतर भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून देण्याचे स्वप्न त्याच्या डोळ्यांत दिसत होते. त्यामुळेच संघातील खेळाडूंवर विश्वास व्यक्त करताना त्याने २३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या प्रवासात सकारात्मक सुरुवात करण्याचा विश्वास व्यक्त केला. जसप्रीतच्या जागी अखेरच मोहम्मद शमीचीच निवड झाली, परंतु तो IND vs PAK सामन्यात खेळण्याची शक्यता फार कमी आहे. कारण, रोहितने तसे संकेत दिले आहेत.

India vs Pakistan सामन्याचं महत्त्व जाणतो, पण...! Rohit Sharmaने 'कट्टर' चाहत्यांचं डोकं ठिकाणावर आणलं

अखेरच्या क्षणी केलेला बदल कधीच उपयोगी ठरत नाही, असे रोहितचे मत आहे. तसेच त्याने हेही सांगितले की मोहम्मद शमीशी अद्याप भेट झालेली नाही. त्यामुळे पहिल्या सामन्यात शमीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नसेल, असे संकेत रोहितने दिले. तो म्हणाला,''मला अखेरच्या क्षणाला बदल करणे आवडत नाही. मैदानावर उतरण्यापूर्वीच आम्हाला खेळाडूंना कोण कोण खेळणार हे सांगायचे आहे, जेणेकरून ते आधीच तयार राहतील. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी मी आधीच प्लेइंग इलेव्हन ठरवली आहे. त्या खेळाडूंना आधीच कळवले गेले आहे. त्यामुळे अखेरच्या मिनिटाला काही बदल करण्यावर माझा विश्वास नाही.''

जसप्रीतच्या जागी मोहम्मद शमी ( Mohammed Shami)  मुख्य संघात खेळणार असल्याचे बीसीसीआयने कालच जाहीर केले. त्यावर रोहित म्हणाला,''मोहम्मद शमीला अद्याप मी भेटलेलो नाही, पंरतु जे काही मी ऐकलं आहे, त्यावरून तो तंदुरुस्त आहे असे मला समजते. NCA मध्ये त्याने भरपूर मेहनत घेतली आहे. रविवारी ब्रिस्बन येथे सराव सत्र आहे आणि त्यात शमी कशी गोलंदाजी करतो हे पाहिल्यानंतर पुढचा निर्णय घेईन.''

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये निडर खेळ करण्याचा पवित्रा आम्ही स्वीकारला आहे. १४० धावांचे लक्ष्य असेल तर ते १४-१५ षटकांतच पार करण्याचे आमचे ध्येय असेल, असे रोहित म्हणाला. यावेळी त्याला जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत विचारले असता त्याने सांगितले की, ''जसप्रीत बुमराहला खेळवण्याचा धोका पत्करू शकतो का, असे आम्ही अनेक तज्ज्ञांना विचारले. त्या सर्वांनी नकार दिला. जसप्रीत हा आता २७-२८ वर्षांचा आहे आणि तो अजून बरीच वर्ष क्रिकेट खेळू शकतो. वर्ल्ड कप हे मोठे व्यासपीठ आहे, परंतु त्याची कारकीर्द ही अत्यंत महत्त्वाची आहे. हो पण आम्ही त्याला मिस करू.''

भारताचा संभाव्य संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध पाकिस्तानरोहित शर्मामोहम्मद शामी
Open in App