T20 World Cup 2022 : India vs Pakistan - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप तयारीसाठी भारतीय संघ पर्थमध्ये पोहोचलाय आणि आज वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सराव सामना खेळतोय. भारताचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास २३ ऑक्टोबरला सुरू होणार आहे आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान त्यांच्यासमोर आहे. २३ ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर IND vs PAK लढत होणार आहे. त्याआधी पाकिस्तानी खेळाडूंकडून विजयाचे दावे करण्यास सुरुवात झाली आहे. मागच्या वर्ल्ड कप स्पर्धेत बाबर आजमच्या नेतृत्वाखाली त्यांनी भारताला पराभूत केले होते आणि त्याची पुनरावृत्ती होईल, असा दावा आजी-माजी पाकिस्तानी खेळाडूंकडून केला जातोय. पण, सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका स्कोअरकार्डची हवा केलीय. २३ ऑक्टोबरला होणाऱ्या लढतीचा हा स्कोअरकार्ड आहे.
एकूण १६ संघांमध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची चुरस रंगणार आहे. राऊंड १, सुपर-१२ आणि प्ले-ऑफ सामने अशा तीन टप्प्यांत ती खेळवली जाणार आहे. सुपर-१२ मध्ये ८ संघ पात्र ठरले आहेत, तर उर्वरित ४ संघ राऊंड १मधून येतील. १६ ऑक्टोबरला राऊंड १ला सुरुवात होणार आहे, तर मुख्य स्पर्धा २२ पासून सुरू होतेय.. २३ ऑक्टोबरला मेलबर्नवर भारत-पाकिस्तान सामन्यासाठी १ लाखांहून अधिक तिकिटं विकली गेली आहेत. आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात १-१ अशी बरोबरी झाली होती. आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कोणता संघ बाजी मारतो याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
पण तत्पूर्वी काल सोशल मीडियावर एक स्कोअरकार्ड व्हायरल झालं. २३ ऑक्टोबर २०२२ ला होणाऱ्या India vs Pakistan यांच्यातल्या सामन्याचे ते स्कोअरकार्ड होतं आणि त्यात भारताचा विजय पक्का असे दिसत होतं. यात विराटच्या ३९ चेंडूंत १०५ धावांच्या जोरावर भारताने १ बाद १८८ धावा केल्या आणि पाकिस्तानचा संपूर्ण संघ ३६ धावांत गुंडाळून १५२ धावांनी विजय मिळवला. भुवनेश्वर कुमारने ९ धावांत ६ विकेट्स घेतल्याचे दिसतेय. मागच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या १५२ धावांच्या लक्ष्याचा पाकिस्तानने १० विकेट्स राखून पराभव केला होता. त्यामुळेच विकीपिडीयावर हा खोडसाळ पणा करण्यात आला आहे.
भारतीय वेळेनुसार (IST) भारताचे सामने-
• भारत विरुद्ध पाकिस्तान, २३ ऑक्टोबर, दुपारी १.३० वाजता (मेलबर्न)• भारत विरुद्ध गट अ उपविजेता, २७ ऑक्टोबर, दुपारी १२.३० वाजता (सिडनी)• भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ३० ऑक्टोबर, दुपारी ४.३० (पर्थ)• भारत विरुद्ध बांगलादेश, २ नोव्हेंबर, दुपारी १.३० वाजता (अॅडलेड)• भारत विरुद्ध गट ब विजेता, ६ नोव्हेंबर दुपारी १.३० वाजता (मेलबर्न)
भारत- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग; राखीव - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर
पाकिस्तान - पाकिस्तानचा संघ -बाबर आजम ( कर्णधार), शादाब खान ( उप कर्णधार), आसीफ अली, हैदर अली, हॅरीस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदील शाह, मोहम्मद हस्नैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादीर; राखीव - फाखर जमान, मोहम्मद हॅरीस, शाहनवाज दहानी
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"