Join us  

T20 World Cup 2022 : रोहित, विराट, लोकेश प्रॅक्टीस करणार कसे? नेट बॉलर्स अजूनही भारतात अडकले; जाणून घ्या कारण 

T20 World Cup 2022 : भारतीय संघासमोरील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांच्या दुखापतीनंतर दीपक चहर ( Deepak Chahar) यानेही माघार घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 12:21 PM

Open in App

T20 World Cup 2022 : भारतीय संघासमोरील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांच्या दुखापतीनंतर दीपक चहर ( Deepak Chahar) यानेही माघार घेतली आहे. त्यात ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या भारतीय फलंदाजांचा सरावही ठिक होऊ शकत नाही. कारण, नेट बॉलर म्हणून निवड झालेले उम्रान मलिक व कुलदीप सेन हे अजूनही भारतातच आहेत. त्यांना अद्याप व्हिसा ( Visa) मिळालेला नाही. आयपीएल २०२२ मध्ये या दोघांची कामगिरी प्रभावी झाली होती. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यास विलंब होत असल्याने हे दोघंही सध्या आपापल्या राज्य संघाकडून मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेत खेळत आहेत. 

See Photo : Australian Dairy! रोहित शर्मा, विराट कोहलीसह टीम इंडियाच्या खेळाडूंची ऑस्ट्रेलिया भ्रमंती

 

 २२ वर्षीय मलिकने आयपीएल २०२२ मध्ये वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. तो जम्मू-काश्मीर चे प्रतिनिधित्व करतोय. त्याच्या याच वेगवान माऱ्याचा भारतीय फलंदाजांचा सराव मिळावा, यासाठी त्याची नेट बॉलर म्हणून निवड केली गेली. पण, व्हिसा न मिळाल्याने तो अजूनही भारतातच आहे. मलिकप्रमाणे कुलदीप सेनचाही प्रवास लांबणीवर पडला आहे. तो मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करतोय. ६ ऑक्टोबरला मलिक, मोहम्मद सिराज व कुलदीप हे भारतीय संघासोबतच जाणे अपेक्षित होते, परंतु जसप्रीतच्या दुखापतीनंतर सिराजची आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत निवड झाली. मलिक व कुलदीप व्हिसा समस्येमुळे नाही जाऊ शकले.   भारतीय संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल,  भुवनेश्वर कुमार,  हर्षल पटेल, अक्षर पटेल,अर्शदीप सिंग. राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर 

सराव सामन्यांचं वेळापत्रक ( Warm-up matches of the Indian team)   

भारत वि. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, १२ ऑक्टोबर भारत वि. ऑस्ट्रेलिया, १७ ऑक्टोबरभारत वि. न्यूझीलंड, १९ ऑक्टोबर 

मुख्य स्पर्धेतील वेळापत्रक

२३ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुपारी १.३० वाजल्यापासून, मेलबर्न२७ ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, दुपारी १२.३० वाजल्यापासून, सिडनी३० ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून, पर्थ२ नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, दुपारी १.३० वाजल्यापासून, एडलेड६ नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, दुपारी १.३० वाजल्यापासून, मेलबर्न१३ नोव्हेंबरला अंतिम सामना थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स, डिस्नी हॉटस्टार 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२2बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ
Open in App