Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाच्या गुडघ्यावर झाली शस्त्रक्रिया, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील समावेशाबाबत BCCIचं विधान

T20 World Cup 2022 :  आशिया चषक २०२२ स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेणारा रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेलाही मुकण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 07:28 PM2022-09-06T19:28:26+5:302022-09-06T19:29:04+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2022 : Ravindra Jadeja confirmed that the surgery has been successful and the rehab will be starting soon, For India T20 WC Squad Selectors waiting for FITNESS report  | Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाच्या गुडघ्यावर झाली शस्त्रक्रिया, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील समावेशाबाबत BCCIचं विधान

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाच्या गुडघ्यावर झाली शस्त्रक्रिया, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील समावेशाबाबत BCCIचं विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2022 :  आशिया चषक २०२२ स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेणारा रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेलाही मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे आणि तो लवकरच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) पुनर्वसनासाठी दाखल होणार आहे. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) व हर्षल पटेल ( Harshal Patel) हेही दुखापतीमुळे संघाबाहेरच आहेत. त्यामुळे भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघाच्या घोषणेसाठी विलंब होतोय. त्यात रवींद्र जडेजाने त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती फोटो पोस्ट करून दिली. पण, तो वेळेत तंदुरुस्त होईल का? BCCIनेही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघाबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत.


आशिया चषक २०२२ स्पर्धेत रवींद्र जडेजा पाकिस्तान व हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात खेळला. पण त्यानंतर त्याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतूनच माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश केला गेला. जडेजा वर्ल्ड कप स्पर्धेलाही मुकेल की काय, अशी चिंता चाहत्यांना वाटतेय. ''वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर करण्यासाठी अद्याप बराच कालावधी आहे. त्यामुळे घाईचं कारण नाही. जसप्रीत, हर्षल व जडेजा यांच्या फिटनेस रिपोर्टची आम्ही प्रतीक्षा पाहतोय. त्यामुळे जेव्हा ते हाती येतील, तेव्हा वर्ल्ड कप साठीचा संघ जाहीर केला जाईल. जसप्रीत या आठवड्यात NCA त दाखल होण्याची शक्यता आहे,''असे निवड समितीतील सदस्याने InsideSport ला सांगितले.

 रवींद्र जडेजाची इंस्टा पोस्ट...
शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली... बीसीसीआय, संघ सहकारी, साहाय्यक स्टाफ, फिजिओ, डॉक्टर्स व फ‌ॅन्स या सर्वांचे आभार. मी लवकरच बरा होण्याचा प्रयत्न करीन आणि लवकरच मैदानावर उतरेन. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार, असे जडेजाने लिहिले.  
 

Web Title: T20 World Cup 2022 : Ravindra Jadeja confirmed that the surgery has been successful and the rehab will be starting soon, For India T20 WC Squad Selectors waiting for FITNESS report 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.