T20 World Cup 2022 : आशिया चषक २०२२ स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेणारा रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेलाही मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे आणि तो लवकरच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) पुनर्वसनासाठी दाखल होणार आहे. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) व हर्षल पटेल ( Harshal Patel) हेही दुखापतीमुळे संघाबाहेरच आहेत. त्यामुळे भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघाच्या घोषणेसाठी विलंब होतोय. त्यात रवींद्र जडेजाने त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती फोटो पोस्ट करून दिली. पण, तो वेळेत तंदुरुस्त होईल का? BCCIनेही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघाबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत.
रवींद्र जडेजाची इंस्टा पोस्ट...शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली... बीसीसीआय, संघ सहकारी, साहाय्यक स्टाफ, फिजिओ, डॉक्टर्स व फॅन्स या सर्वांचे आभार. मी लवकरच बरा होण्याचा प्रयत्न करीन आणि लवकरच मैदानावर उतरेन. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार, असे जडेजाने लिहिले.