T20 World Cup 2022 : India vs Pakistan सामन्याचं महत्त्व जाणतो, पण...! Rohit Sharmaने 'कट्टर' चाहत्यांचं डोकं ठिकाणावर आणलं

T20 World Cup 2022, Rohit Sharma Press Conference : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या २३ ऑक्टोबरला होणाऱ्या लढतीची सर्व तिकीटं विकली गेली आहे आणि काल एक्स्ट्रा तिकीटही १० मिनिटांत संपली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 09:46 AM2022-10-15T09:46:47+5:302022-10-15T09:47:11+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2022 : Rohit Sharma on India vs Pakistan : We understand the importance of the game against them, but there's no point talking about it all time | T20 World Cup 2022 : India vs Pakistan सामन्याचं महत्त्व जाणतो, पण...! Rohit Sharmaने 'कट्टर' चाहत्यांचं डोकं ठिकाणावर आणलं

T20 World Cup 2022 : India vs Pakistan सामन्याचं महत्त्व जाणतो, पण...! Rohit Sharmaने 'कट्टर' चाहत्यांचं डोकं ठिकाणावर आणलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2022, Rohit Sharma Press Conference : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेला रविवारपासून सुरूवात होतेय. पहिल्या फेरीतील संघांमध्ये सुपर १२ मध्ये जाण्यासाठीची चुरस सुरू होणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या २३ ऑक्टोबरला होणाऱ्या लढतीची सर्व तिकीटं विकली गेली आहे आणि काल एक्स्ट्रा तिकीटही १० मिनिटांत संपली. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ १५ वर्षांचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयाचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक आहे. मागच्या वर्ल्ड कपमध्ये साखळी फेरीतच गाशा गुंडाळण्याची नामुष्की भारतावर ओढावली होती. त्यात पाकिस्तानकडून ( India vs Pakistan) यांच्याकडून झालेल्या दुखापतीच्या वेदना अजूनही भारतीय चाहत्यांच्या मनावर ताज्या आहेत. पण, रोहितने आज दोन्ही देशांतील 'कट्टर' चाहत्यांचं डोकं ठिकाणावर आणणारे भाष्य केले.

वर्ल्ड कप खूप मोठं व्यासपीठ, पण जसप्रीतचे करियर अत्यंत महत्त्वाचे; Rohit Sharma असं का म्हणाला?

भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत मागच्या वर्षापर्यंत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून एकदाही हरलेला नव्हता. पण, बाबर आजमच्या नेतृत्वाखाली यूएईत भारताला १० विकेट्सने हार मानावी लागली. बाबर व मोहम्मद रिझवान या दोघांनीच १५३ धावांचे लक्ष्य सहज पार केले. त्यानंतर आशिया चषक २०२२ स्पर्धेत उभय संघ पुन्हा एकमेकांविरुद्ध खेळले आणि त्यात १-१ अशी बरोबरी झालीय. आता सर्वांना उत्सुकता आहे ती २३ ऑक्टोबरला मेलबर्नवर होणाऱ्या लढतीची. या लढतीची लाखभर तिकीटं विकली गेली आहेत. भारत-पाकिस्तान सामना म्हटला की दोन्ही देशांतील चाहत्यांमध्ये देशभक्तीची लाट उसळते आणि परिणामी स्टेडियमवर अनेकदा भांडणंही होताना पाहिली गेली आहेत. पण, हेच चित्र क्रिकेटपटूंमध्ये असतं का?

ना लोकेश राहुल, ना विराट कोहली; रोहित शर्माने सांगितला टीम इंडियाचा X फॅक्टर 


रोहित शर्मा म्हणाला, आम्ही आशिया चषक स्पर्धेदरम्यान भेटलो होतो, तेव्हा आम्ही एकमेकांच्या कुटुंबियांची विचारपूस केली, घरच्या गप्पा मारल्या. कोणती कार घेतली किंवा घेणार आहात हेही विचारले. आम्ही आधीच्या जनरेशननेही आम्हाला अशाच काही चर्चा मैदानावर खेळाडूंमध्ये व्हायच्या असं सांगितलं आहे. भारत-पाकिस्तान लढतीचे महत्त्व आम्ही जाणतो, परंतु सतत त्याचा विचार करून तणाव वाढवून घेत नाही.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: T20 World Cup 2022 : Rohit Sharma on India vs Pakistan : We understand the importance of the game against them, but there's no point talking about it all time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.