Sachin Tendulkar: ENG विरुद्धच्या दारुण पराभवानंतर सचिन तेंडुलकरची पहिली रिअ‍ॅक्शन, असं बोलून सर्वांनाच केलं चकित!

इंग्लंडविरुद्धच्या दारूण पराभवानंतर क्रिकेटचा देव म्हणल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्याने टीम इंडियासाठी एक मोठी गोष्ट सांगितली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 10:20 PM2022-11-12T22:20:17+5:302022-11-12T22:21:50+5:30

whatsapp join usJoin us
t20 world cup 2022 sachin tendulkar on india loss semifinal vs england | Sachin Tendulkar: ENG विरुद्धच्या दारुण पराभवानंतर सचिन तेंडुलकरची पहिली रिअ‍ॅक्शन, असं बोलून सर्वांनाच केलं चकित!

Sachin Tendulkar: ENG विरुद्धच्या दारुण पराभवानंतर सचिन तेंडुलकरची पहिली रिअ‍ॅक्शन, असं बोलून सर्वांनाच केलं चकित!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टी-20 विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा दारुण पराभव केला. यानंतर टीम इंडियावर सर्वच स्थरांतून टीका होत आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच, इंग्लंडविरुद्धच्या दारूण पराभवानंतर क्रिकेटचा देव म्हणल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्याने टीम इंडियासाठी एक मोठी गोष्ट सांगितली आहे.

काय म्हणाला सचिन तेंडुलकर? -
सचिन तेंडुलकर म्हणाला, 'England विरुद्धच्या उपांत्य फेरीत झालेला पराभव अत्यंत निराश करणारा होता. अॅडिलेड ओव्हलमध्ये 168 धावांचे लक्ष्य पुरेसे नव्हते. कारण मैदानाचा शेपच अशा प्रकारचा आहे, साइड बाउंड्रीज छोट्या आहेत. 190 अथवा याच्या जवळपासचा स्कोर योग्य होता. आपण बोर्डवर मोठे लक्ष्य देऊ शकलो नाही. आपल्याला विकेट्स घेण्यातही यश आले नाही. इंग्लंड टफ टीम आहे. 10 विकेट्सनी पराभूत होणे हा दारून पराभव आहे.

खेळाडूंचीही चांगला खेळ करण्याची इच्छा असते -
सचिन तेंडुलकर पुढे म्हणाला, 'केवळ एका सामन्याच्या आधारे आपण भारतीय संघाच्या कामगिरीचे मुल्यमापण करू शकत नाही. आपण टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकाचा संघ आहोत. हे रात्रीतूनच होत नाही. येथे पोहोचण्यासाठी दीर्घकाळ चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळावे लागते. बाहेर जाऊन फेल होण्याची खिलाडूचीही इच्छा नसते. खेळात चढ उतार येत असतात. आपल्याला यात एकजुटीने राहावे लागेल.'

लाजिरवाणा पराभव - 
टी-20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 बाद 168 धावा केल्या होत्या. ज्याचा  पाठलाग करताना इंग्लिश संघाने 10 गडी राखून सहज विजय मिळवला. भारताकडून विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र भारतीय गोलंदाजांना इंग्लंडचा एकही बळी मिळवता आला नाही. अखेर इंग्लिश संघाने 16 षटकांतच 169 धावा करत फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडकडून सलामीवीर कर्णधार जोस बटलर आणि ॲलेक्स हेल्स यांनी अनुक्रनमे 80 आणि 89 धावांची नाबाद खेळी केली.

Web Title: t20 world cup 2022 sachin tendulkar on india loss semifinal vs england

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.