T20 World Cup 2022: पाकिस्तानविरुद्ध विजय मिळाला, पण त्या कारणाने वाढलीय टीम इंडियाची चिंता

T20 World Cup 2022: अर्शदीप सिंगची भेदक गोलंदाजी, हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी आणि विराट कोहलीने केलेली तुफानी फटकेबाजी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. मात्र पाकिस्तानविरुद्ध मोठा विजय मिळवला असला तरी काही गोष्टी संघाच्या चिंता वाढवणाऱ्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 10:07 PM2022-10-24T22:07:03+5:302022-10-24T22:07:47+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2022: Victory against Pakistan, but that has raised concerns for Team India | T20 World Cup 2022: पाकिस्तानविरुद्ध विजय मिळाला, पण त्या कारणाने वाढलीय टीम इंडियाची चिंता

T20 World Cup 2022: पाकिस्तानविरुद्ध विजय मिळाला, पण त्या कारणाने वाढलीय टीम इंडियाची चिंता

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबर्न - काल मेलबर्नमध्ये झालेल्या रोमांचक लढतीत पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत भारताने टी-२० विश्वचषकातील आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली आहे. अर्शदीप सिंगची भेदक गोलंदाजी, हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी आणि विराट कोहलीने केलेली तुफानी फटकेबाजी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. मात्र पाकिस्तानविरुद्ध मोठा विजय मिळवला असला तरी काही गोष्टी संघाच्या चिंता वाढवणाऱ्या आहेत.

यामधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार लोकेश राहुल यांना वारंवार येत असलेलं अपयश. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १५९ धावा जमवल्यानंतर भारतीय संघ जेव्हा या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरला तेव्हा फॅन्सना दोन्ही सलामीवीरांकडून खूप अपेक्षा होती. मात्र रोहिल शर्मा आणि लोकेश राहुल पाकिस्तानविरुद्ध पुन्हा एकदा अपयशी ठरले.

२०२१ च्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या लढतीत रोहित शर्मा आणि लोकेश राहुलची फलंदाजी निराशाजनक झाली होती. २०२२ मध्येही तेच चित्र पुन्हा दिसले आणि रोहित शर्मा आणि लोकेश राहुल स्वस्तात माघारी परतले. सलामीवीर माघारी परतल्यानंतर भारताची फलंदाजी कोलमडली आणि संघाची ४ बाद ३१ अशी अवस्था झाली.

वर्ल्डकपपूर्वी भारताच्या सलामी जोडीबाबत खूप चर्चा होती. मात्र पहिल्याच सामन्यात दोन्ही सलामीवीरांनी निराशा केल्याने टीम इंडियाची चिंता वाढली आहे. नसीम शाहने सुरुवातीला के. एल. राहुलला त्रिफळाचित केले. त्यावेळी तो केवळ ४ धावांवर खेळत होता. त्यानंतर रोहित शर्माही हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानेही केवळ ४ धावा काढल्या होत्या.  

Web Title: T20 World Cup 2022: Victory against Pakistan, but that has raised concerns for Team India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.