T20 World Cup 2022 : भारत आणि बांगलादेश यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड स्पर्धेतील आजचा सामना ग्रुप २ मधून उपांत्य फेरीचा दावेदार ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रुप १ मध्ये न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांचे प्रत्येकी ५ गुण असल्याने त्याही गटात चुरस आहेच. भारताच्या गटात दक्षिण आफ्रिकेचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के मानले जात आहे. पाकिस्तान, बांगलादेश यांना अजूनही तुरळक संधी आहे. झिम्बाब्वेला आज नेदरलँड्सकडून पराभूत होताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आल्यात जमा आहे. अशात पाकिस्तान, भारत व बांगलादेश यांच्यात कडवी टक्कर आहे. त्यामुळे जर तर च्या समीकरणारवर सर्व गणित अवलंबून आहे.
दुष्काळात तेरावा महिना! पाकिस्तानचे सेमी फायनल गाठण्याचे वांदे, त्यात स्टार फलंदाज बाहेर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानी टीम इंडियाच्या बाजूने उभा राहिला होता. भारताने हा सामना जिंकला असता तर पाकिस्तानला फायदा झाला असता अन् आफ्रिकेचा काटा काढला गेला असता. पण, दक्षिण आफ्रिकेने उल्लेखनीय कामगिरी करून टीम इंडियाचा विजयरथ रोखला अन् विजय मिळवताना पाकिस्तानला धक्का दिला. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताच्या बाजूने उभा राहणारा पाकिस्तान आज बांगलादेशच्या विजयाची प्रार्थना करताना दिसतोय. आज बांगलादेश जिंकल्या ६ गुणांसह ते टेबल टॉपर होतील आणि मग पाकिस्तानला उर्वरित दोन ( बांगलादेश व दक्षिण आफ्रिका) लढती जिंकून उपांत्य फेरीत जाता येईल
झिम्बाव्बेविरोधातील बांगलादेशच्या विजयानंतर सुपर १२ मधील ग्रुप २ अधिकच थरारक झाला आहे. भारतीय संघाला आपले पुढील दोन सामने बांगलादेश आणि झिम्बाव्बेसोबत खेळायचे आहेत. तीन सामन्यांनंतर चार अंकांसह भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघाचा नेट रनरेट +०.८४४ आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन विजय आणि ५ गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. त्यांचा नेट रनरेट +२.७७२ आहे.
पाकिस्तानला आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील आणि त्याचवेळी भारत व आफ्रिकेच्या पराभव व्हावा लागेल. भारताला उर्वरित लढतीत बांगलादेश व नेदरलँड्सचा सामना करायचा आहे. या दोन्ही संघांनी भारताला धक्का दिल्यास रोहित अँड टीम ४ गुणांवरच राहिल. पाकिस्तान दोन सामने जिंकून ६ गुणांसह आणि बांगलादेश ६ गुणांसह उपांत्य फेरीत जाऊ शकतील .
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"