T20 world cup 2023 : भारतीय महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी BCCI सचिव जय शाह, आशिष शेलार आफ्रिकेत  

T20 world cup 2023 : आजचा दिवस भारतीय महिला क्रिकेट संघासाठी महत्त्वाचा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 11:34 AM2023-02-23T11:34:00+5:302023-02-23T11:51:06+5:30

whatsapp join usJoin us
T20 world cup 2023 : Bcci secretary jay shah and treasurer ashish shelar to attend india women vs australia women semifinals | T20 world cup 2023 : भारतीय महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी BCCI सचिव जय शाह, आशिष शेलार आफ्रिकेत  

T20 world cup 2023 : भारतीय महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी BCCI सचिव जय शाह, आशिष शेलार आफ्रिकेत  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 world cup 2023 : आजचा दिवस भारतीय महिला क्रिकेट संघासाठी महत्त्वाचा आहे. ICC महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप (ICC Womens T20 WC 20223) स्पर्धाचा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात केपटाऊन, दक्षिण आफ्रिकेत खेळवला जाणार आहे. भारतीय महिला संघाचे मनोबल वाढवण्यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शाह आणि खजिनदार आशिष शेलार दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत आणि ते स्टेडियमवर उपस्थित असणार आहेत.  

भारत ब गटात दुसऱ्या स्थानावर राहून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. गतविजेता ऑस्ट्रेलियाने चारही साखळी सामने जिंकून अ गटात अव्वल स्थान पटकावले आहे. न्यूलँड्स येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात करणे भारतासाठी कठीण असेल. जगज्जेत्यांविरुद्ध भारताची कामगिरी गेल्या काही वर्षांत खराब राहिली आहे. मात्र, यावेळी त्यांना त्यांच्या चुका सुधारण्याची संधी आहे. भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आत्मविश्वास देण्यासाठी, BCCI सचिव जय शाह आणि खजिनदार आशिष शेलार दक्षिण आफ्रिकेत पोहोचतील.  

आयर्लंडविरुद्ध भारतीय महिला संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार ५ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतरच भारताचे उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित झाले.  

भारतीय महिला संघ : यस्तिका भाटिया, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (क), रिचा घोष (विकेटकीपर), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकार, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग, स्मृती मानधना, शिखा पांडे, देविका वैद्य, अंजली सरवाणी.

ऑस्ट्रेलिया महिला संघ: मेग लॅनिंग (सी), अॅलिसा हिली (व्हीसी), डी'आर्सी ब्राउन, अॅशले गार्डनर, किम गर्थ, हेदर ग्रॅहम, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, ताहलिया मॅकग्रा, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शूट , अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम.
 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: T20 world cup 2023 : Bcci secretary jay shah and treasurer ashish shelar to attend india women vs australia women semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.