AFG vs BAN : "आम्ही अफगाणिस्तानमध्ये गेल्यावर...", ऐतिहासिक विजयानंतर राशिद भावूक; म्हणाला...

AFG vs BAN Live Match : बांगलादेशचा पराभव करून अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 11:16 AM2024-06-25T11:16:44+5:302024-06-25T11:17:21+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2024, AFG vs BAN Live Match Rashid Khan said, It's a dream come true for us. I have no words | AFG vs BAN : "आम्ही अफगाणिस्तानमध्ये गेल्यावर...", ऐतिहासिक विजयानंतर राशिद भावूक; म्हणाला...

AFG vs BAN : "आम्ही अफगाणिस्तानमध्ये गेल्यावर...", ऐतिहासिक विजयानंतर राशिद भावूक; म्हणाला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024, AFG vs BAN Live Match : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या उपांत्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या चार संघांमध्ये दोन आशियाई संघांचा समावेश आहे. भारतीय संघापाठोपाठ अफगाणिस्तानने देखील उपांत्य फेरीत स्थान मिळवले. अटीतटीच्या लढतीत बांगलादेशला पराभवाची धूळ चारून अफगाणिस्तानने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा करेक्ट कार्यक्रम केला. अफगाणिस्तानच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पाऊस, राशिद खानचे वादळ आणि लिटन दासची संयमी खेळी... यामुळे हा सामना प्रेक्षणीय ठरला. पण, अखेर आठ धावांनी सामना जिंकून राशिद खानच्या नेतृत्वातील संघाने ऐतिहासिक कामगिरी केली.

अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानला विजयानंतर वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लाराचे शब्द आठवले. सामन्यानंतर बोलताना राशिद म्हणाला की, आम्ही आमच्या मायदेशात परतल्यावर जोरदार जल्लोष करू. आमच्या देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. मला याबद्दल बोलण्यासाठी शब्दही कमी पडत आहेत. ब्रायन लारा हा एकमेव जाणकार होता ज्याने अफगाणिस्तान उपांत्य फेरी गाठेल असे सांगितले होते. आम्ही त्याला भेटलो आणि तुझ्या शब्दांवर आम्ही खरे उतरू असे सांगितले होते. जे आत सत्यात उतरले आहे. आज अखेर आमचे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होईल, तर अफगाणिस्तान अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करेल. 

अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय

ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ मधील अखेरचा सामना नाना कारणांनी खास ठरला. अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या या सामन्यावर ऑस्ट्रेलियन संघाचे भवितव्य अवलंबून होते. कारण दोन्हीही संघांसाठी उपांत्य फेरीत जाण्याची संधी होती. याशिवाय अफगाणिस्तानच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचा मार्ग मोकळा होणार होता. पण, पावसाची बॅटिंग अन् साऱ्यांचीच धाकधुक वाढली. अखेर अफगाणिस्तानने ८ धावांनी सामना जिंकून प्रथमच उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. अफगाणिस्तानने निर्धारित २० षटकांत ५ बाद ११५ धावा करून बांगलादेशला विजयासाठी ११६ धावांचे लक्ष्य दिले होते. पण, पावसामुळे अनेकदा सामना थांबवावा लागला. मग एक षटक कमी करण्यात आले. राशिद खानने सर्वाधिक चार बळी घेऊन बांगलादेशला १७.५ षटकांत १०५ धावांवर सर्वबाद केले आणि ८ धावांनी सामना जिंकला. या विजयासह अफगाणिस्तानने प्रथमच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला, तर ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आले. 

Web Title: T20 World Cup 2024, AFG vs BAN Live Match Rashid Khan said, It's a dream come true for us. I have no words

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.