Join us  

AFG vs BAN : अफगाणिस्तान प्रथमच सेमीफायनलमध्ये; राजधानी काबुलमध्ये चाहत्यांचा एकच जल्लोष

AFG vs BAN Live Match updates : राशिद खानच्या नेतृत्वातील अफगाणिस्तानचा उपांत्य फेरीत प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 11:32 AM

Open in App

T20 World Cup 2024, AFG vs BAN Live Match : आशियाई देश अफगाणिस्तानने मंगळवारी ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांनी बांगलादेशचा पराभव करून पहिल्यांदाच आयसीसी ट्वेंटी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. अफगाणिस्तानच्या या विजयामुळे बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. अटीतटीच्या लढतीत बांगलादेशला पराभवाची धूळ चारून अफगाणिस्तानने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा करेक्ट कार्यक्रम केला. अफगाणिस्तानच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पाऊस, राशिद खानचे वादळ आणि लिटन दासची संयमी खेळी... यामुळे हा सामना प्रेक्षणीय ठरला. पण, अखेर आठ धावांनी सामना जिंकून राशिद खानच्या नेतृत्वातील संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. आपल्या संघाने उपांत्य फेरी गाठताच अफगाणिस्तानमध्ये चाहते एकवटले. त्यांनी जोरदार जल्लोष करत राशिद खानच्या नेतृत्वातील संघाच्या खेळीला दाद दिली. 

दरम्यान, उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होईल, तर अफगाणिस्तान अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करेल. अफगाणिस्तानच्या विजयानंतर राजधानी काबुल येथे चाहत्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली. सामन्यानंतर बोलताना कर्णधार राशिद म्हणाला की, आम्ही आमच्या मायदेशात परतल्यावर जोरदार जल्लोष करू. आमच्या देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. मला याबद्दल बोलण्यासाठी शब्दही कमी पडत आहेत

अफगाणिस्तान प्रथमच सेमीफायनलमध्येट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ मधील अखेरचा सामना नाना कारणांनी खास ठरला. अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या या सामन्यावर ऑस्ट्रेलियन संघाचे भवितव्य अवलंबून होते. कारण दोन्हीही संघांसाठी उपांत्य फेरीत जाण्याची संधी होती. याशिवाय अफगाणिस्तानच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचा मार्ग मोकळा होणार होता. पण, पावसाची बॅटिंग अन् साऱ्यांचीच धाकधुक वाढली. अखेर अफगाणिस्तानने ८ धावांनी सामना जिंकून प्रथमच उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. अफगाणिस्तानने निर्धारित २० षटकांत ५ बाद ११५ धावा करून बांगलादेशला विजयासाठी ११६ धावांचे लक्ष्य दिले होते. पण, पावसामुळे अनेकदा सामना थांबवावा लागला. मग एक षटक कमी करण्यात आले. राशिद खानने सर्वाधिक चार बळी घेऊन बांगलादेशला १७.५ षटकांत १०५ धावांवर सर्वबाद केले आणि ८ धावांनी सामना जिंकला. या विजयासह अफगाणिस्तानने प्रथमच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला, तर ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आले. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024अफगाणिस्तानबांगलादेशऑफ द फिल्ड