AFG vs PNG Live Match Updates In Marathi : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधील २९ व्या सामन्यात अफगाणिस्तान आणि पापुआ न्यू गिनी हे संघ आमनेसामने आहेत. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी पापुआ न्यू गिनी संघाला अवघ्या ९५ धावांत गुंडाळून अफगाणिस्तानने सुपर-८ च्या दिशेने कूच केली. त्यांना सुपर-८ मध्ये प्रवेश करण्यासाठी अवघ्या ९६ धावांची आवश्यकता आहे. ब्रायन लारा क्रिकेट अकादमी येथे हा सामना होत आहे. (Afghanistan vs Papua New Guinea Live Match Updates)
पापुआ न्यू गिनी संघाकडून यष्टीरक्षक फलंदाज किप्लिन डोरिगा (२७) वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी आजही कमाल करत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना घाम फोडला. अफगाणिस्तानकडून फजलहक फारूकीने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर नवीन-उल-हक (२) आणि नूर अहमदने (१) बळी घेतला. पापुआ न्यू गिनीचे तब्बल चार फलंदाज धावबाद झाले. अखेर पापुआ न्यू गिनीचा संघ १९.५ षटकांत केवळ ९५ धावांत गारद झाला.
दरम्यान, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड हे संघ क गटात आहेत. या गटातून सुपर-८ साठी पात्र ठरणारा वेस्ट इंडिज पहिला संघ ठरला. त्यांनी तीनपैकी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला. दुसरीकडे न्यूझीलंडने दोनपैकी दोन्ही सामने गमावले आहेत. अफगाणिस्तानने दोनपैकी दोन्ही सामने जिंकून चार गुणांसह सुपर-८ साठी दावा ठोकला आहे. खरे तर न्यूझीलंडने उर्वरीत दोन सामने जिंकल्यास आणि अफगाणिस्तानने उरलेले दोन्ही सामने गमावल्यास दोन्ही संघांचे ४-४ गुण राहतील. पण, नेटरनरेटच्या बाबतीत राशिद खानचा संघ वरचढ असल्याने ते सुपर-८ साठी पात्र ठरण्याची शक्यता अधिक आहे. सध्या अफगाणिस्तानचा सामना सुरू असून, ते सहज विजय मिळवून सुपर-८ चे तिकीट कन्फर्म करतील असे अपेक्षित आहे. त्यामुळे किवी संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
Web Title: T20 World Cup 2024 AFG vs PNG live match updates Afghanistan continues to shine Just 96 runs required for ticket to Super-8
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.